रोज चार कप कॉफी सेवनाने अकाली मृत्यूची शक्यता कमी होते व दीर्घायुष्य लाभते, असा दावा एका अभ्यासाअंती करण्यात आला आहे. स्पेनमधील द नवारो रुग्णालयातील संशोधनात असे म्हटले आहे की, जे लोक कॉफी पीत नाहीत त्यांच्या तुलनेत विचार करता जे राज चार कप कॉफी पितात त्यांच्या मृत्यूची शक्यता ६४ टक्क्यांनी कमी होते. कॉफीच्या सेवनाने सर्व प्रकारच्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूची जोखीम २२ टक्क्यांनी कमी होते. या रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ अडेला नवारो यांनी सांगितले की, कॉफी हे जगात अनेक लोकांचे आवडते पेय आहे. कॉफी व ४५ तसेच त्यावरील लोकांचे मृत्यू यांचा संबंध पाहिला असता हे प्रमाण व्यस्त दिसून आले. कॉफीमुळे अनेक रोगांपासून संरक्षण मिळते असा दावा करण्यात आला आहे. याआधीच्या अभ्यासातही मृत्यूच्या सर्व कारणांपासून कॉफीने संरक्षण मिळते असे म्हटले होते, पण त्याचा अभ्यास भूमध्यसागरी देशात करण्यात आलेला नाही. एकूण सरासरी ३७.७ वर्षे वय असलेल्या १९८९६ लोकांनी या पाहणीत भाग घेतला होता. यात सहभागी व्यक्तींना त्यांच्या अन्नपद्धतींबाबत प्रश्नावली देण्यात आली होती, त्यात कॉफी सेवनाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. एकूण दहा वर्षे त्यांचे कॉफी सेवन व त्यांची आरोग्य स्थिती याची पाहणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा