ब्रिटिश संशोधकांचा दावा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नियमित कॉफीचे सेवन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवसातून दररोज तीन ते चार वेळा कॉफीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला ‘टाइप टू मधुमेह’ होण्याचा धोका कमी असतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे.
ब्रिटनमधील आरहस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांना कॉफीमध्ये दोन प्रकारची संयुगे आढळून आली, जी आरोग्यासाठी हितकारक अशी आहेत. मधुमेहासारख्या आजाराला रोखण्यासाठी आणि त्यावर उपचारासाठी ही संयुगे उपयुक्त ठरणार आहे, असा या संशोधकांचा दावा आहे.
साधारणपणे ‘टाइप टू मधुमेहा’ला प्रतिबंध करण्यासाठी इन्सुलिनच्या वापरातून अन्नात ग्लुकोजमधून ऊर्जानिर्मिती केली जाते. स्वादुपिंडामार्फत इन्सुलीनची निर्मिती होत असते, पण त्याचे प्रमाण मर्यादित स्वरूपाचे असते. उच्च रक्तदाब असणाऱ्यामध्ये ग्लुकोजचे अतिप्रमाण शरीराला घातक ठरते. यामुळे कायमचे अंधत्व आणि मज्जातंतूवर आघात होण्याची शक्यतादेखील बळावते.
आनुवांशिकपणा आणि जीवनशैली टाइप टू मधुमेह बळावण्यास जबाबदार ठरते. पण कॉफीच्या सेवनामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यासाठी कॉफीतील कॅफेन कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता, पण संशोधनातून शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनवर कॅफेनचा काही काळापुरताच प्रभाव राहत असल्याचे पुढे आले आहे, तर दुसरीकडे कॅफेनविरहित कॉफीतूनही अशाच प्रकारचे संतुलन ठेवले जात असल्यामुळे याबाबतच्या दाव्यातही तथ्य नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
आरहस विद्यापीठाचे सोरेन ग्रेजर्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉफीमधील अन्य घटकांचे डेन्मार्कच्या रुग्णालयात केलेल्या परीक्षणानंतर कॅफेस्टोल आणि कॅफेक अॅसिड ग्लुकोजमधील इन्सुलिनला वेगळे करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचबरोबर कॅफेस्टोलमुळे विहित केलेल्या औषधाप्रमाणेच शरीरातील धमन्यांमधील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होत आहे, पण कॉफी फिल्टरच्या वापरामुळे कॅफेस्टोलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे अन्य संयुगेदेखील दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.