व्यग्र जीवनशैलीमुळे व्यायामाचे आखलेले गणित तंतोतंत पाळणे बहुतांश वेळा अनेकांना शक्य होत नाही. पण अशा परिस्थितीत कॉफी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण कॉफीमुळे आळस झटकला जाऊन व्यायाम करण्याची नियमितता कायम राखता येते, असा दावा ब्रिटिश संशोधकांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्यायामाचा संकल्प आखणारे बहुतांश जण पहिले सहा महिने हा संकल्प कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर हळूहळू व्यायाम कमी करतात आणि अखेरीस तो बंदही केला जातो. वेळ नसणे, झोप न होणे, आळशीपणा आदी कारणे त्यामागे आहेत. पण कॉपी ही त्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे ब्रिटनमधील केंट विद्यापीठाचे प्रा. सॅम्युल मॅरकोरा यांनी सांगितले. ‘‘व्यायाम करीत असताना जर कॅफिनचे प्रमाण नियमित असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. व्यायामाचा संकल्प पूर्ण करणाऱ्यांसाठी कॉफीचे सेवन उपयुक्त आहे. सध्या असणारा कमी वेळ हा व्यायामासाठी मुख्य अडथळा ठरत असतो. कारण दररोजच्या कामाचे गणित आखतानाच आपली शक्ती खर्च होते. पण वेळ काढून आणि आळस झटकून जर व्यायाम केला तर तो तंदरुस्त शरीरासाठी उपयोगी ठरतो. मॅरकोरा यांनी याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधताना मेहनत घेण्याचे आकलन असल्यामुळेच अनेकांची प्रवृत्ती ही रिकाम्या वेळेतही बसूनच काम करण्याची असते. त्यासाठी कॉफी किंवा अन्य शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांमुळे व्यायामाच्या वेळी घ्याव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये अधिक सहजपणा येतो. धूम्रपान करणाऱ्या आणि लठ्ठपणा असलेल्या अनेक व्यक्ती व्यायामापासून दूर जातात. त्यामुळे त्यांना थकवा आणि अनेक विकार जडतात. कॉफीचे नियमित सेवन केल्याने व्यायामाची गोडी लागून नियमितता टिकविता येऊ शकते, असे मॅरकोरा यांनी सांगितले. हे संशोधन ‘जर्नल स्पोर्ट्स मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.