Cold Weather and Heart Attack: हिवाळा सुरू झाला की रोगांना आमंत्रण मिळते. आपल्या शरीरात अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. या ऋतूत हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३० पट जास्त असते. हिवाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात थंडी जाणवू लागते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्त बाहेर येण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो, त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढू लागतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

( हे ही वाचा: High Uric Acid किडनी, लिव्हर आणि हृदयासाठी ठरते घातक; तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ ६ पदार्थ याला नियंत्रित करतात)

मणिपाल रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ अंशुल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, हिवाळ्यात सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. कमी तापमानामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हे बदल शरीरातील प्रत्येक भागामध्ये जसे हृदय, रक्तवाहिन्या आणि हार्मोन्समध्ये होतात. जसजसे तापमान कमी होते, तसतसे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे शरीरावर दबाव पडतो. उच्च रक्तदाब आपल्या हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवतो.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी पाळा

  • तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर सकाळी लवकर चालणे टाळा.
  • सकाळी ६ ते ७ वाजता चालण्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • हिवाळ्यात चालण्यासाठी सकाळी ९ ची वेळ निश्चित करा.
  • हिवाळ्यात जेवणात मीठाचे सेवन कमी करा. जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाला काम करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.
  • उन्हात जास्त वेळ घालवा म्हणजे आकुंचन झालेल्या रक्तवाहिन्या सामान्य स्थितीत होतील.

( हे ही वाचा : तुम्हालाही चालताना वेदना जाणवतायत का? असू शकतं कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण, इतर गंभीर लक्षणेही जाणून घ्या)

  • हिवाळ्यात नियमित व्यायाम आणि चालण्याने शरीर तर निरोगी राहतेच शिवाय शरीर उबदार राहते.
  • हिवाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवा. या ऋतूत तळलेले, भाजलेले आणि गोड खाण्याची लालसा वाढते. अशा आहारामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • या ऋतूत आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.