Collagen Rich Foods List In Marathi : वयानुसार, त्वचेतील काही प्रथिने कमी होऊ लागतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. पण, आजकाल लहान वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत.तर याचं मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये गडबड. आपल्या शरीरात कोलेजन नावाचे प्रोटीन असते, जेव्हा या प्रोटीनचे प्रमाण शरीरात कमी होऊ लागते, तेव्हा माणसाची त्वचा सैल होऊ लागते. कोलेजन हे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे जे पेशी आणि टिश्यूंची (ऊतींची) काळजी घेतात. त्यामुळे जर शरीराला आवश्यक प्रमाणात हे प्रोटीन मिळत नसेल तर त्यामुळे त्वचा पातळ आणि चेहऱ्याची लवचिकता कमी होऊ शकते. अशावेळी पुढील काही पदार्थांचा तुम्ही आहारात समाविष्ट करून शरीरातील कोलेजनची पातळी (Collagen Rich Foods) वाढवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर आता जाणून घेऊया कोणत्या फूडमध्ये कोलेजन जास्त प्रमाणात असते? (Collagen Rich Foods List)

१. सिट्रस फळे : संत्री, द्राक्षे, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी तर स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरात प्रो-कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात.

२. पालेभाज्या : तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा कारण ते कोलेजनचे प्रमाण वाढवतील. हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, ब्रोकोली भरपूर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. मिरपूड, गाजर, काकड्या, हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट जीवनसत्त्वे आणि सिलिका असतात, जे कोलेजनचे उत्पादन, त्वचेचे आरोग्य वाढवतात. तसेच लसणामध्ये सल्फर असते, ज्यामुळे कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा…Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

३. सुकी फळे आणि बिया : बदाम, अक्रोड, अंबाडी, चिया सीड्स यात असणाऱ्या फॅटी ऍसिडस्मुळे कोलेजन तयार होतात.

४. दही आणि तूप : दही हे प्रोबायोटिक्सने भरलेले खाद्यपदार्थ आहे, जे पचनसंस्थेला सुधारते आणि त्यामुळे कोलेजन तयार होण्यात मदत करते.दुसरीकडे, तुपामध्ये ए, डी, ई आणि के (A, D, E, K) ही पोषक तत्वे असतात, जी कोलेजन तयार करत राहतात आणि त्वचेच्या आरोग्यास समर्थन देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collagen rich foods adding to your diet include leafy vegetables in your diet as they will increase the amount of collagen asp