बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. मानसिक ताण, धावपळ, आहारातील लक्षणीय बदल आदींमुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढली आहे. उतार वयात होणारा हृदयरोग आता चाळिशीच्या आतील  व्यक्तीना होत असल्याचे आढळते. हृदयरोगाची कारणे अनेक सांगितली जाता. मात्र, एकाच ठिकाणी अधिक काळ बसल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे एका संशोधनातून सिध्द झाले आहे.
हृदयविकार टाळण्यासाठी एका ठिकाणी बसण्याचे प्रमाण कमी करणे आणि शारीरिक व्यायाम वाढवणे या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एका ठिकाणी बसून काम करावे लागत असले तरी अधिकाधिक कार्यक्षम राहाणे आवश्यक असल्याचे ‘कॅन्सर परमनंट’ या संस्थेचे शास्त्रज्ञ देबोरा रोहम यंग यांनी सांगितले.
या संस्थेने या विषयावर संशोधनावर केले असून, संशोधकांनी ४५ ते ६९ वयोगटातील ८४,१७० पुरुषांची पाहणी केली. या संशोधनात व्यक्तींच्या शारीरिक ऊर्जेचा अभ्यास करून निरिक्षणे नोंदवण्यात आली. शारीरिक श्रम नसणाऱ्या ५२ टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये हृदयविकार आढळला. आठ वर्षे सतत संशोधन केल्यानंतर हे निष्कर्ष मिळाले असल्याचे संशोधकांनी सांगितले. दिवसभरात कामाव्यतिरिक्त पुरुष पाच पेक्षाअधिक तास बसतात. त्यांमुळे महिलांच्या तुलनेत हृदयविकाराचे प्रमाण ३४ टक्क्याहून अधिक आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘सर्क्युलेशन: हार्ट अटॅक’ या नियतकालीकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Story img Loader