हिवाळा संपून आता तापमान वाढण्याची आणि उष्ण वारे वाहण्याची वेळ आली आहे. याशिवाय गरमीमुळे अनेक आजार होण्याची संभावनाही वाढली आहे. अशा परिस्थितीत आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवणे आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. यासाठी लोक अनेक उपाय करत असतात.
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी सतत पाणी पित राहणे गरजेचे आहे. आपण पाण्याऐवजी इतरही काही गोष्टींचे सेवन करू शकतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अजिबात कमी होणार नाही. आज आपण अशाच काही पेयांबद्दल जाणून घेणार आहोत. ही पेये तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहील आणि तुम्हाला उष्णतेपासून आराम देखील मिळेल.
तुम्हालाही खूप तहान लागते का? असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण
कैरीचे पन्हे :
उन्हाळ्यात आंबा आणि कैरी मोठ्याप्रमाणावर खाल्ले जातात. बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबा उपलब्ध होतो. प्रत्येकजण आवडीने आंबा खातो. आंब्याशिवाय कैरी खाणेही लोकांना आवडते. अशावेळी तुम्ही कैरी पन्ह तयार करून पिऊ शकता. यामध्ये उपलब्ध असलेले व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शिअम, पोटॅशिअमसारखे घटक शरीराला आवश्यक पोषण देतात. कैरी, काही मसाले आणि ताजी पुदिन्याची पाने यांच्यापासून बनलेले कैरीचे पन्ह शरीराला थंडावा देते.
लिंबू पाणी :
भारतीय घरांमध्ये वरचे वर लिंबू पाणी बनवले जाते. उन्हाळ्यात तहान आणि शरीरातील पाण्याची कमतरता भागवण्यासाठी लिंबू पाणी अवश्य प्यावे. थंड पाण्यात लिंबाचा रस, साखर, मीठ आणि काळे मीठ टाकून चवदार लिंबूपाणी तयार होते.
करोना संक्रमणाच्या धोक्यावर गायीचे दूध ठरणार रामबाण उपाय; अभ्यासातून समोर आली माहिती
जलजीरा :
उन्हाळ्यात लोक अनेकदा जलजीराचे पाणी पिताना दिसतात. शरीराला थंड ठेवण्यासाठी जलजीरा सेवन करणे देखील खूप उपयुक्त आहे. यासाठी फक्त एका ग्लास पाण्यात जलजीरा पावडर टाकून सेवन करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये बडीशेप, काळी मिरी, पुदिन्याची पाने आणि आले घालून त्याची चव वाढवू शकता.
ताक :
उन्हाळ्यात एक ग्लास थंड ताक प्यायल्याने शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि त्यामुळे शरीर थंडही राहते. अनेकदा दह्यापासून बनवले जातात आणि दही आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण सर्वच जाणतो. त्यामुळे घरीच दह्याचे ताक बनवून प्यावे.
लस्सी :
ताकाशिवाय तुम्ही दह्याचा वापर करून स्वादिष्ट लस्सी बनवू शकता. चवीनुसार साखर आणि थोडे काळे मीठ टाकून लस्सी बनवा आणि त्याचे सेवन करा.
फळांचा रस :
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, आपण नियमितपणे वेगवेगळ्या फळांचे रस देखील सेवन केले पाहिजे. यामध्ये संत्र्याचा रस, द्राक्षांचा रस, टरबूजाचा रस यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे.