Salt Side Effects : आपल्या आहारात मिठाला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे आपल्या अन्नाची चव समजते. मिठाशिवाय अन्न एकदम बेचव लागते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे काय होते? नुकत्याच कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते.
काय सांगतो रिसर्च?
कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना उंदरांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त मीठयुक्त आहारामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी ७५ टक्क्यांनी वाढते. प्रौढांसाठी शिफारस केलेले मीठ दिवसातून सहा ग्रॅमपेक्षा कमी असते परंतु बहुतेक लोक नियमितपणे नऊ ग्रॅम खातात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त मीठ सेवन केल्याने चिंता आणि आक्रमकता यांसारख्या इतर वर्तणुकीतील बदल होतात का हे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत. हा अभ्यास कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे.
मीठ अति सेवन झाल्याने होतोय धोका!
एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी म्हटलं आहे की, आपण जे अन्न खातो त्यामध्ये असलेले मीठ आपले मानसिक आरोग्य कसे बदलते, हे समजून घेण्यासाठी आणि त्या दृष्टीने बदल करण्यासाठी हे संशोधन एक महत्त्वाचं पाऊल आहे. जास्त मीठ खाल्ल्याने आपले हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचे नुकसान होते. तसेच आपल्या अन्नातील जास्त मीठ आपल्या मेंदूचा ताण हाताळण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करतो, असं या अभ्यासात समोर आल्याचं बेली यांनी सांगितलं आहे.
(आणखी वाचा : Water Intake According Weight: वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे? भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे नेमकं किती? जाणून घ्या सविस्तर )
मीठ सेवन करण्याचं योग्य प्रमाण काय?
प्रौढांनी दररोज सहा ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करणं हे योग्य प्रमाण आहे, पण अभ्यासानुसार, प्रौढांमध्ये मिठाचे सेवन नऊ टक्के आहे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. शिवाय हृदयविकाराचा झटका, रक्तवहिन्यासंबंधी आजाराचा धोकाही वाढतो. जास्त मीठ सेवन केल्याने व्यक्तीच्या स्वभावात अधिक आक्रमकता येते की नाही हे ठरवण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत.
जास्त मीठ सेवन केल्याने ‘या’ आजारांना निमंत्रण
सोडियम आणि क्लोराईड शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे काम करतात. पण जर मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर शरीराला खूप नुकसान होऊ शकतं. जास्त मिठाच्या सेवनामुळे रक्तदाब, पोटाचा कर्करोग, किडनीचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यू यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.