Avoid 4 foods in breakfast: मधुमेह हा एक जुनाट आजार आहे ज्यामध्ये शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते. इन्सुलिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. इन्सुलिनबद्दल बोलायचे तर, हा एक प्रकारचा संप्रेरक आहे जो पाचक ग्रंथीद्वारे तयार होतो ज्याचे कार्य अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. वारंवार तहान लागणे, लघवी जास्त होणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, जखमा लवकर न भरणे आणि दृष्टी कमी होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत. दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते.

अपोलो हॉस्पिटल ग्रेटर नोएडाचे डायबेटीस आणि थायरॉईड स्पेशलिस्ट डॉ. बी.के. राय यांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा मधुमेही रुग्णांची फास्टिंग शुगर जास्त राहते, अशा परिस्थितीत जास्त ग्लायसेमिक पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी ४०० mg/dl च्या पुढे जाऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये असे पदार्थ खावेत ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. काही पदार्थ जे लोक सकाळच्या नाश्त्यात खातात त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

व्हाईट ब्रेड खाणे टाळा

लोक नेहमी सकाळच्या नाश्त्यात व्हाईट ब्रेडचे सेवन करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्हाईट ब्रेडच्या सेवनाने आरोग्यावर विषाप्रमाणे परिणाम होतो. पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे ते सहज पचते. त्याची शोषणाची प्रक्रिया खूप वेगवान असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते.

( हे ही वाचा: खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो; ‘या’ एका गोष्टीने वेळीच करा कंट्रोल)

चहा आणि कॉफीचे सेवन करू नका

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असते, तर सकाळच्या नाश्त्यात चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. चहामध्ये थिओफिलिन नावाचे संयुग असते, ज्यामुळे डिहाइड्रेशन होते. चहा आणि कॉफी हे द्रव पदार्थ आहेत जे लवकर पचतात आणि रक्तातील साखरेवर लवकर परिणाम करतात.

पॅक केलेला ज्यूस सकाळी पिऊ नका

बरेचदा लोक सकाळी ज्यूसचे सेवन करतात, मधुमेही रुग्णांनी पॅकबंद ज्यूस सकाळी अजिबात घेऊ नये. पॅक केलेला रस सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

टोस्टचे सेवन टाळा

अनेकदा मधुमेही रुग्ण सकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत टोस्ट खातात. टोस्टमध्ये साखर आणि तेल वापरले जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. या पदार्थांमुळे रक्तातील साखर वाढते आणि लठ्ठपणाही वाढतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consuming these 4 types of foods in the morning breakfast can increase blood sugar level know list gps