तूप हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्येवर घरगुती उपाय म्हणून, तूप नेहमीच प्रभावी ठरते. आयुर्वेदिक औषधांमध्ये तूप सक्रिय घटक म्हणून वापरले जाते. तुपाचा उपयोग अनेक पारंपारिक औषधांमध्ये त्याच्या शक्तिशाली आरोग्य फायद्यांसाठी केला जातो. येथे काही गोष्टी आहेत ज्यां तुपात मिसळून सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यातही मदत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गोष्टी तुपात मिसळून सेवन करा

१. मेथी
मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ओळखले जातात. या संभाव्य फायद्यांचा समावेश करण्यासाठी तुम्ही तुपात मेथीचे दाणे टाकू शकता.

२. हळद
हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले एक संयुग आहे. तुपात हळद घातल्याने त्याचे दाहक-विरोधी प्रभाव वाढू शकतात.

हेही वाचा – दररोज किती पावले चालल्यास मृत्यूचा होतो धोका कमी? वाचा संशोधन काय सांगते

३. दालचिनी
दालचिनीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तुपात चिमूटभर दालचिनी टाकल्याने उत्तम चव आणि संभाव्य आरोग्य फायदे मिळू शकतात.

४. अश्वगंधा
अश्वगंधा ही एक एडाप्टोजेनिक औषधी वनस्पती आहे जी शरीराला तणावाचा सामना करण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन देण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. अश्वगंधा पावडर तुपात मिसळल्याने तुमच्या शरीराला त्यातील सक्रिय संयुगे शोषून घेणे सोपे जाते.

हेही वाचा – ह्रदयासाठी का आवश्यक आहे ‘हा’ आहार? अभ्यासातून समोर आला निष्कर्ष

५. वेलची
वेलची त्याच्या पाचक फायदे आणि आनंददायी सुगंधासाठी ओळखली जाते. तुपात वेलची घातल्याने पचनास मदत होऊ शकते आणि तुमच्या पदार्थांना एक अनोखी चव येते.

६. काळी मिरी
काळ्या मिरीमध्ये पाइपरिन हे एक संयुग असते जे हळदीपासून कर्क्यूमिनचे शोषण वाढवते. काळी मिरी तूप आणि हळद मिसळल्याने कर्क्युमिनचे शोषण वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consuming these 6 things mixed with ghee increases the power and taste of these superfoods snk