डाळी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यातून आपल्याला आवश्यक पोषक तर मिळतातच पण काही आजार आपल्या आजूबाजूलाही फिरकत नाहीत. तथापि, अशा काही डाळी आहेत, ज्याच्या सेवनाने आपले आरोग्य बिघडू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा डाळींचे सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, अशा डाळी पचायला जड असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा डाळींचे सेवन करू नये. या डाळींमध्ये उडदाच्या डाळीचाही समावेश होतो. चला तर मग जाणून घेऊया ही डाळ रात्री का खाऊ नये आणि यामुळे आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते.

Health Tips : तुम्ही कधी चिंचेच्या पानांचा चहा प्यायला आहात का? ‘हे’ आश्चर्यकारक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

उडदाची डाळ पचायला थोडी अवघड असते. म्हणून, ते कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: तुम्ही रात्रीच्या वेळी या डाळीचे सेवन केले तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. ज्यांचे पोट खराब असते, अशा लोकांनी या डाळीपासून दूर राहावे.

युरिक अ‍ॅसिड वाढवण्यातही ही डाळ आघाडीवर आहे. म्हणजेच ज्या लोकांना आधीच युरिक अ‍ॅसिडची समस्या आहे त्यांनी या डाळीपासून दूर राहावे, अन्यथा तुमची समस्या वाढेल आणि हात-पाय दुखू लागतील.

उडदाच्या डाळीमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. म्हणजेच किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला या डाळीचे सेवन कमी करावे लागेल. अन्यथा तुमच्या किडनीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांशी संपर्क साधावा.)