Contraceptive Pills Causes Infertility: लग्नानंतर अनेक वर्ष मुलाबाळांची प्रयत्न करणारी अनेक जोडपी आपणही पाहिली असतील, त्यांच्या कहाण्या ऐकल्या असतील पण नेमकं मुलं न होण्यामागचं मूळ कारण काय हे अजूनही अनिश्चितच आहे. किंबहुना एक अमुक कारणामुळेच बाळ होत नाही असे ठाम सांगता येत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार नियमित जीवनशैलीतील अशा अनेक गोष्टी किंवा सवयी इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व येण्यासाठी कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या ही अलीकडे खूप कॉमन झाली आहे. गर्भाशय भ्रूणाची वाढ न होण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं हा प्रश्न अनेकांना पडतो. यातील एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वंध्यत्व येते का? आज याच प्रश्नावर आपण वैद्यकीय सल्ला जाणून घेणार आहोत.
जेव्हा बाळाचे प्लॅनिंग न करताच विना कंडोम वापरता शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हा अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. काही महिला तर कंडोम वापरूनही केवळ अधिक खबरदारी बाळगण्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स घेतात. यामुळे भविष्यात होणाऱ्या (अपेक्षित) गर्भधारणेवर नेमका काय व कसा परिणाम होतो हे आपण पाहुयात..
बर्थ कंट्रोल पिल्स घेऊनही गर्भधारणेचा धोका असतो का?
सिटीजन स्पेशियलिटी हॉस्पिटल, हैदराबादच्य वरिष्ठ सल्लागार व इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ अनीता कुन्नैया सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्या केवळ ओव्यूलेशनची प्रक्रिया थांबवतात जेणेकरून अनपेक्षित गर्भधारणा टाळता येते. या गोळ्या तुमच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम करत नाहीत.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये २०१८ ला अहवालात सुद्धा याची पुष्टी करण्यात आली आहे. बर्थ कंट्रोल पिल्समुळे महिलांच्या गर्भारणेच्या क्षमतेवर प्रभाव होत नाही मात्र अनेक महिलांच्या मनात याविषयीच संभ्रमच असतो. डॉ. कुन्नैया सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्यांमधील हार्मोन्स हे ओव्यूलेशन प्रक्रिया थांबवतात त्यामुळे काहीवेळा मासिक पाळी येण्यास उशीर होऊ शकतो. उशिरा येणाऱ्या पिरियड्स हे गर्भधारणेचे एक लक्षण असल्याने काही महिलांना सुरुवातीला आपण प्रेगनंट असल्याची भीती असते.
तोंडात लाल पांढरे फोड येत आहेत? अल्सरवर ‘हे’ घरगुती उपचार ठरतात रामबाण उपाय, ‘ही’ चूक करू नकाच
सिटीजन स्पेशियलिटी हॉस्पिटलच्या गायनॉकॉलॉजिस्ट राधिका बनहट्टी यांनीही गर्भधारणेच्या संबंधित समज- गैरसमजांवर भाष्य केले. बर्थ कंट्रोल पिल्स या पिरीएड्सच्या सायकलला अंशतः प्रभावित करतात. जेव्हा महिला या गर्भनिरोधक गोळ्या घेत नाहीत तेव्हाही मासिक पाळीचे चक्र सुरळीत व्हायला वेळ लागू शकतो. वेळेवर न येणाऱ्या मासिक पाळीमुळेच अनेकांना वंध्यत्वाचा धोका भासतो. थोडक्यात सांगायचं तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते पण त्यामुळे थेट वंध्यत्व येण्याची शक्यता नगण्य असते.
बर्थ कंट्रोल पिल्स घेणे बंद केल्यावर गर्भधारणा होण्यास किती दिवस थांबावे लागते?
गर्भनिरोधक गोळ्या घेण्याबाबत आणखी एक सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जेव्हा या बर्थ कंट्रोल गोळ्या घेणे बंद केले जाते तेव्हा त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो का? सतत गोळ्या घेतल्याने शरीरात बर्थ कंट्रोल हार्मोन्स तयार होतात का आणि असे असल्यास शरीर स्वच्छ करण्यासाठी काय करावे असाही प्रश्न असतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे सर्व केवळ मानसिक समज आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव एक ते दोन महिन्यांच्या वर टिकत नाही परिणामि ज्या महिन्यापासून तुम्ही या गोळ्या घेणे थांबवाल त्याच्या एक ते दोन महिन्यांनंतर तुमचे शरीर भ्रूणाच्या वाढीसाठी सक्षम होते.
तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…
(टीप- वंध्यत्वाशी संबंधित प्रश्न असल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.)