Cooked Vegetables VS Uncooked Vegetables : आपल्या सर्वांना माहित आहे की भाज्या आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. आपल्या दैनंदिन आहारात भाज्या समाविष्ट करणे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे असतात. परंतु कोणती निवडायची हे ठरवणे कठीण आहे. प्रत्येक भाजीचे वेगवेगळे फायदे आहेत. भाज्या कच्च्या खाल्‍याने जास्त फायदा होतो की शिजवून खाल्‍याने हा मुद्दा नेहमीच चर्चेचा असतो. बहुतेक भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. तसेच, काही भाज्या देखील आहेत, ज्या सलाड म्हणून वापरल्या जातात, म्हणजेच कच्च्या खाल्ल्या जातात. काहींच्या मते, भाज्या शिजवणे हा त्यातील पोषक तत्वे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर काहींच्या मते कच्च्या भाज्या खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तुम्हाला माहितीये का? कच्च्या भाज्या अधिक पौष्टीक असतात की शिजवलेल्या भाज्या जास्त पौष्टीक असतात. चला यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.

कच्च्या आणि शिजवलेल्या भाज्यांमध्ये काय फरक आहे? पोषणतज्ञ अमिता गद्रे यांच्या मते, कच्च्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. पण जेव्हा तुम्ही या भाज्या शिजवता तेव्हा त्यातून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची थोडीशी मात्रा कमी होते. तेव्हा जीवनसत्त्वेही कमी होतात. तर बऱ्याच लोकांना कच्च्या भाज्या खाल्ल्याने सूज येणे, जडपणा आणि गॅस होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे अवघड आहे, असे गद्रे यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही पद्धती अन्नातून अधिक पोषक मिळवण्यासाठी योग्य आहेत असं पोषणतज्ञ अमिता गद्रे सांगतात..

bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
How Much Water Should Pregnant Women Drink? Heres What Expert Says know more details
गर्भवती महिलांनी रोज किती पाणी प्यावे? वाचा एकदा, तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती…
kitchen cloth cleaning tips hacks
किचनमधील तेल, मसाल्याच्या डागांमुळे तेलकट मळकट झालेले फडके काही मिनिटांत होईल साफ; वापरा फक्त ‘या’ सोप्या टिप्स
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…

कोणत्या भाज्या कच्चे खाणे चांगले?

वर नमूद केल्याप्रमाणे, काही खाद्यपदार्थ शिजवल्यावर त्यातील व्हिटॅमिन सी आणि बी पोषक घटक कमी होतात. मात्र तरीही आपण सगळ्याच भाज्या कच्चा खाऊ शकत नाही. पण तुम्ही कोबी, ब्रोकोली आणि काकडी या कच्च्या भाज्यांचे सेवन करू शकता.

कोणत्या भाज्या भाज्या शिजल्यानंतर पौष्टिक होतात

१. पालक

पालेभाज्या पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही भाजी शिजवून खाल्ल्यास जास्त कॅल्शियम आणि लोह मिळू शकते. कारण पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते, जे लोह आणि कॅल्शियमचे शोषण रोखते. पण शिजवल्यानंतर भाजीतून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळू शकतात.

२. टोमॅटो

बॅस्टिर युनिव्हर्सिटीच्या पोषण आणि व्यायाम विज्ञान विभागाच्या मते, टोमॅटो शिजवून खाल्ल्यास त्यातून व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. 2002 मध्ये जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की शिजवलेल्या टोमॅटोमध्ये कच्च्या टोमॅटोपेक्षा लाइकोपीनची पातळी लक्षणीयरीत्या जास्त असते.

३. मशरूम

मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. कच्च्या मशरूमपेक्षा शिजवलेल्या मशरूममध्ये पोटॅशियम, नियासिन आणि झिंकचे प्रमाण जास्त असते.

४. गाजर

गाजरमध्ये कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. हाडांच्या वाढीस मदत करण्यात, दृष्टी वाढविण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हेही वाचा >> Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक

टीप : वरील सर्व बाबी लोकसत्ता केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकसत्ता कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Story img Loader