सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि कमी बजेटमध्ये घर थंड करण्यासाठी जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो. कुलरमुळे घर थंड राहते. पण आपल्या घरातील कुलरला नियमित साफ करणे देखील महत्वाचे आहे. सतत कुलरचा वापर केल्याने त्यावर धूळ जमा होते. धुळीने माखलेला कुलर थंड हवा देत नाही. तसेच वेळेवर साफ न केल्यास यातून दुर्गंधी येते. व ही दुर्गंधी घरभर पसरते. कुलर स्वच्छ करण्यासाठी बहुतेक लोक साबण आणि सर्फची मदत घेतात. पण, या गोष्टींनी लाख घासूनही कुलर बॅक्टेरिया आणि वासमुक्त ठेवणे कठीण आहे. परंतु एका महिलेने घरगुती जुगाड दाखविला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कुलर स्वच्छ करु शकता.
गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेने कुलर स्वच्छ करण्यासाठी जुगाड दाखविला आहे. सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल प्लॅटफॉर्म व्हायरल व्हिडिओचा खजिना आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कधी लोकांचे अनोखे जुगाड पाहायला मिळतात. तर कधी लोकांना आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. चला तर मग महिलेने दाखविलेला जुगाड आपण पाहूया…
(हे ही वाचा: उन्हाळ्यात तुमच्या घरातील दूध लवकर नासतं? फक्त ‘या’ ४ सोप्या गोष्टी करुन पाहा, २४ तास राहील फ्रेश…)
नेमकं काय करायचं?
व्हिडिओत दाखवल्यानुसार, महिलेने एक बाऊल घेऊन त्यात व्हाईट व्हिनेगर घातलं आहे. मग यात थोडसं बेकींग सोडा घातल आहे. आणि अर्धा लिंबूचा रस घालून हे मिश्रण एकत्र केलं आहे. मग स्क्रबच्या मदतीने कुलरला घासायला सुरुवात केली आहे. याच्या मदतीने कुलरचे सर्व पार्ट घासून काढलं आहे. कूलरचा कूलिंग पॅड स्वच्छ केला आहे. पाणी पण सतत बदलत राहा, या उपायामुळे कुलरमधून वास पण येणार नाही, असे गृहिणीने सांगितले आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Vlogger surbhi Kashyap या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)