तांब्याची बाटली किंवा मातीच्या माठातून पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे असतात असे म्हणतात. दोन्ही पदार्थांचे स्वत:चे काही फायदे-तोटे आहे. तांबे हा आपल्या शरीराला रक्तात लाल पेशी तयार करण्यासाठी मदत करतो आणि मज्जातंतू पेशींना आणि रोगप्रतिकार शक्तीला आरोग्यदायी ठेवते. तसेच त्यामुळे शरीरालातील उती, हाडे आणि पेशी यांच्यी वाढ होण्यास मदत होते. तर दुसरीकडे मातीच्या भांडे पाणी शोषून घेते आणि थंडावा देते. मातीच्या मटक्यातील पाणी हे घशासाठी अत्यंत लाभदायी आहे.
तांब्याची बाटली की मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या आणि कोणत्या भांड्यातून पाणी पिणे योग्य आहे ते ठरवा.
तांब्याची बाटली की मातीचा माठ, जाणून घ्या दोन्हीचे फायदे
तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने होणारे फायदे
- अमेरिकान कॅन्सर सोसायचीच्या संशोधनानुसार, तांब्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रीग्लेसेराईची पातळी कमी होते.
- तसेच ते अन्नाचे विभाजन करण्यासाठी मदत करते जे शरीराराला लोह शोषूण घेण्यासाठी मदत करते आणि शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करते .
- तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुलभ होते आणि जे ह्दय आणि रक्तवाहिण्यांची प्रणालीस मदत करते.
- आपल्या शरीरात साचलेल्या चरबीचे विभाजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो जेणेकरून पाण्याच्या बाटलीतून तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो.
- उन्हाळ्यामध्ये ते शरीराला थंडावा आणि आराम देते
हेही वाचा : खाण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवा ‘हे’ पाच पदार्थ, आरोग्यासाठी मिळतील अनेक फायदे
मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने होणारे फायदे
- मातीचा माठ म्हणजे मटक्यमध्ये थंडवा देणारे गुणधर्म असतात जे उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर ठरते. ते तुमच्या शरीराला थंडावा देणे
- मातीचा मटक्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या अल्कालाईन असते ते संतूलन साधण्यास मदत करते जे आपण खाणाऱ्या अॅसिडिक (जळजळ वाढवणारे) अन्न पदार्थांमुळे निर्माण होते. असे केल्याने ते शरीरालातील पीएच बॅलन्स संतूलित करतो.
- मातीच्या भांड्यातील पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील मेटॉबॉलिल्म आणि पचक्रिया सुधारते.असे केल्यााने थंडावा देणारे गुणधर्म उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणाऱ्या उष्माघात, पक्षाघात आणि अतिसार यांच्यापासून शरीराला सुरक्षित ठेवतो.
- माठ हा नैसर्गिक फ्लिटर आहे. माठाची सुक्ष्म छिद्रांची रचना पाण्यातील दुषित पदार्थांना अवरोधित करते.