coriander cultivation : कोथिंबीर ही दररोजच्या जेवणामध्ये सर्वांत जास्त वापरली जाणारी पालेभाजी आहे. कोथिंबिरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याशिवाय जेवणाचा स्वाद वाढवण्याचे महत्त्वाचे कामसुद्धा कोथिंबीर करते.
तुम्ही १० किंवा २० रुपये जुडी कोथिंबीर विकत आणता का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरी कोथिंबीरची लागवड कशी करायची, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ त्याविषयी…

घरी कोथिंबीर कशी लावायची?

  • घरी कोथिंबीरची लागवड करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. तुम्ही घरी असलेल्या धण्याचा वापर करू शकता. सुरुवातीला तुम्हाला कोथिंबीर कुठे लावायची आहे, ती जागा ठरवा. एखाद्या कुंडीत जर तुम्ही कोथिंबीर लावत असाल, तर ते अधिक चांगले आहे.

हेही वाचा : पालकांनो, तुमची मुले अभ्यास करत नाहीत? ‘या’ टिप्स वापरून पाहा; न सांगता करतील अभ्यास….

  • दोन मूठभर धणे घ्या. हे धणे रगडून त्यांचे दोन भाग करा. रगडून ठेवलेले हे धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाण्यात भिजत घातलेले धणे गाळून घ्यावे.
  • कोथिंबीर लागवडीसाठी पसरट कुंडी घ्या. या कुंडीत काळी माती टाका. त्यावर कंपोस्ट खत, शेणखत व थोडी वाळू टाका. कुंडीतील थोडी माती बाजूला काढून घ्या. गाळून घेतलेले धणे एका डब्बात काढा. हे धणे कुंडीतील मातीवर टाकून, त्यावर बाजूला काढलेली माती टाका. धणे मातीने झाकल्यानंतर थोडे थोडे पाणी शिंपडा.
  • कुंडी नेहमी सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. कोथिंबिरीच्या लागवडीसाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. सकाळ-संध्याकाळ कुंडीतील धण्यांना पाणी घाला. एका महिन्यात कुंडीमध्ये कोथिंबीर वाढलेली दिसेल.

हेही वाचा : याला म्हणतात नशीब! मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

कोथिंबीर लागवडीची ही सोपी पद्धत वापरून तुम्ही घरच्या घरी कोथिंबिरीची शेती करू शकता. एवढंच काय, तर तुम्ही स्थानिक बाजारपेठेत कोथिंबिरीची विक्री करून पैसेसुद्धा कमावू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader