Coriander Juice On An Empty Stomach: कोणताही पदार्थ तयार झाल्यानंतर आपण शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करतो. कोथिंबिरीमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. कोथिंबीर हा पदार्थ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतोच. भाजी, चटणी, स्नॅक्स हे पदार्थ कोथिंबीर घातल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. पण, तुम्हाला माहीत आहे का कोथिंबिरीच्या पाण्याचे आरोग्याला खूपच फायदे होतात. कोथिंबीर आपल्या जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण, तुम्ही कधी कोथिंबिरीचा रस प्यायला आहात का? नाही ना.., मग आजपासून तुमच्या आहारात कोथिंबिरीच्या रासाचा समावेश नक्की करा. रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो जाणून घेऊयात.

रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
How To make Leftover rice cutlet
Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

१. वजन कमी करण्यात मदत

तुम्ही वजन कमी करण्यासाठी संघर्ष करत आहात का? तसे असल्यास सकाळी सर्वप्रथम कोथिंबिरीचा रस पिणे सुरू करा. कोथिंबिरीच्या पानांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने त्यांचा रस भूक कमी करते. वजन कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा रस पिताना त्यामध्ये कोणताही गोड पदार्थ टाकू नये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार कोथिंबीरमध्ये असलेले पॉलिफेनॉल लठ्ठपणा सुधारण्यास मदत करू शकतात.

२. पचनासाठी उत्तम

कोथिंबिरीचा रस पचनाच्या आरोग्याला चालना देण्यासाठीदेखील मदत करू शकतो. कोथिंबिरीची पाने अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या विकारांपासून मुक्त होण्यास मदत करतात. नियमितपणे कोथिंबिरीचा रस पिणे सुरू करा आणि स्वतःमध्ये बदल पाहा.

३. त्वचा निरोगी राहते

कोथिंबिरीचा रस तुमच्या त्वचेला पोषण देते. तुम्हाला अलीकडे त्वचेच्या समस्यांशी सामना करावा लागत असल्यास, रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायला सुरुवात करा. कोथिंबीरमधून आपल्याला अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मिळते. हे दोन्ही त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत, ज्यामुळे त्याचा रस तुमच्या त्वचेला आतून पोषक बनवतो.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत

नियमित रूपात कोथिंबिरीचे पाणी पिण्यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी प्राप्त होते. कोथिंबिरीच्या पाण्यामुळे प्रतिकारशक्ती बुस्ट होते आणि आजारपणापासून माणूस अधिक दूर राहतो. एक ग्लास कोथिंबिरीचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

हेही वाचा >> Skin Care Tips : स्वच्छ आणि चमकदार त्वचा हवीये? काकडी आणि अननसाचा ज्यूस प्यायला लगेच सुरुवात करा

कोथिंबिरीचा रस घरी कसा बनवायचा?

घरी कोथिंबिरीचा रस बनवणे अगदी सोपे आहे. तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत : सर्वप्रथम कोथिंबिरीची पाने नीट धुवून सुरुवात करा आणि नंतर ब्लेंडरमध्ये घाला, त्यानंतर किसलेले आले घाला. अतिरिक्त चवीसाठी तुम्ही किसलेले गाजरदेखील घालू शकता. आता पाणी घाला आणि एक गुळगुळीत प्युरी बनवा. जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर अधिक पाणी घाला. त्यानंतर मीठ आणि मिरपूडसह थोडासा लिंबाचा रस घाला. नीट ढवळून घ्या आणि बर्फाचे तुकडे भरलेल्या ग्लासमध्ये घाला. तुमचा चविष्ट असा कोथिंबिरीचा रस तयार आहे.