कोथिंबीरची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. शिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर वापरली जाते हे आपणाला माहितीच आहे. कोथिंबीर ही लोकप्रिय किचन गार्डनिंग वनस्पतींपैकी एक आहे. आयुर्वेदानुसार धणे अंगदुखी आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आपले रक्षण करतात. इतकंच नाही तर कोथिंबीर युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिनची रक्त पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. त्यामुळेच धणे हे आरोग्य धन जपणारे आहेत असं म्हटलं जातं.
परंतु, केवळ कोथिंबीरच्या पानांचा वापर करुन युरिक ऍसिडची पातळी कमी होऊ शकत नाही. परंतु औषधांसह युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिन पातळीला कमी करण्यास ती गती देऊ शकतात. शिवाय ते लघवीच्या प्रवाहासाठीही खूप फायदेशीर मानली जातात, धणे लघवीद्वारे युरिक ऍसिड झपाट्याने काढण्यासही फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे किडनी संबंधीत अनेक समस्यांपासून आपला बचाव करण्यासही त्याची मदत होते. तर या औषधी वनस्पतीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
हेही वाचा- शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात ‘ही’ फळं; हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील उपयुक्त
असा करा वापर –
मूठभर कोथिंबीर घ्या आणि ती स्वच्छ धुवा. पाने वापरण्यापूर्वी ३० मिनिटं ती मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा, कारण बाजारातून आणलेला भाजीपाला कीटकनाशके आणि इतर रसायनांमुळे मोठ्या प्रमाणात दूषित होतो. त्यामुळे त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी ती मिठात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कोथिंबीरचे देठ कापून टाका, त्यानंतर एका भांड्यात दोन ग्लास पाण्यात कोथींबीर टाका आणि दहा मिनिटे ते पाणी उकळा. त्यानंतर झाकण न काढताच ते पाणी थंड होऊ द्या आणि सकासकाळी घ्या.
हेही वाचा- धूम्रपान आणि गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो? तज्ञ सांगतात…
कोथिंबीरचे इतर फायदे –
- कोथिंबीरमध्ये लिनोलिक ऍसिड आणि सिनेओल असते. या घटकांमध्ये संधिवात आणि अँटीह्युमेटिक प्रभाव असतो. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.धणे खाल्ल्याने रक्तदाब लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचं सिद्ध झाले आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.
- कोथिंबीरीत कॅल्शियम असते जे मजबूत हाडांसाठी गरजेचे असते.
- धणे लोहाचा चांगला स्रोत आहेत. तुमच्या आहारात नियमितपणे धणे समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.