करोना विषाणूच्या साथीमुळे कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. दुसरीकडे यातून बरे झाल्यानंतरही विविध आजारांनी लोकांना वेठीस धरले आहे. करोनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत अनेक संशोधनं समोर आली आहेत. करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता ढासळते, एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. या धक्कादायक खुलाशानंतर पुरुषांची चिंता वाढली आहे. फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलमधील अहवालानुसार संशोधकांना असे आढळून आले आहे की, पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर करोनाचा दीर्घकाळ प्रभाव पडतो. चला, शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तुमचा आहार कसा असावा, याबाबत जाणून घेऊयात.
- आहारात सुधारणा करा- पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता वंध्यत्वाचं मुख्य कारण आहे. प्रजनन प्रणाली शरीराला मिळणाऱ्या पोषक आणि जीवनसत्त्वांवर अवलंबून असते. उत्तम आहार घेतल्यास त्यांची प्रजनन क्षमता सुधारली जाऊ शकते. चांगला आहार टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवू शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या तसेच शुक्राणूंची गतिशीलता आणि गुणवत्ता वाढू शकते.
- बाबा रामदेव यांचा सल्ला- बाबा रामदेव यांच्या मते योगामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या, गतिशीलता सुधारण्यास मदत होते. तसेच कामवासनाही वाढते. यासाठी धनुरासन, अग्निसार क्रिया, सेतुबंधासन, हलासन आणि पद्मासन हे फायदेशीर आहेत. यामुळे शुक्राणूंची संख्या सुधारते.
- व्हिटॅमिन डी- व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळते आणि ते पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन डी लैंगिक हार्मोन्स प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढवते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. याशिवाय अंडी, दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मासे हे देखील व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्त्रोत आहेत.
- ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्- आरोग्य तज्ञांच्या मते, सॅल्मन मासा आणि फ्लेक्ससीडमध्ये आढळणारे ओमेगा -3 प्रजनन क्षमता वाढवण्यास खूप उपयुक्त आहे. प्रजनन क्षमता वाढवायची असेल, तर ओमेगा-३ समृद्ध पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
- दुग्धजन्य पदार्थ आणि गाजर- दुधात सर्व पोषक घटक असतात. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने प्रजनन क्षमता वाढते. त्यामुळे तुमच्या आहार चार्टमध्ये दूध, दही, लोणी, चीज यांचा समावेश करा. त्याचवेळी, हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांना संशोधनात आढळून आले की, गाजरात आढळणारा घटक पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतो. गाजरांमध्ये कॅरोटीन नावाचे रसायन असते.शुक्राणूंच्या संख्येसोबत गुणवत्ता देखील सुधारते.