करोनातून बरे होऊन आल्यानंतर जो तो आपल्या प्रमाणे स्वता:ची काळजी घेत असतो. आणि पुन्हा करोना होऊ नये म्हणून आपण आपल्या आहारात बदल करतो. त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. करोनातून बरे झालेल्या व्यक्तींना अशक्तपणा जाणवतो, जास्त चालवत नाही, तसेच योग्य अशी पुरेशी झोप ही आरोग्य राखण्यासाठी महत्वाची आहे. या सर्वातून लवकर ठणठणीत बरे होण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात करोनातून ठीक होऊन आल्यानंतर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश आवश्यक आहे…
1. आपल्या आहारात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कारण मसाल्याच्या पदार्थाने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आणि त्याने तुमच्या पोटात दुखणे जळजळ होणे असे त्रास देखील होऊ शकतात.
2. जेवण बनवताना गरम पाण्याचा वापर करून जेवण शिजवावे. कारण गरम पाण्याने जेवणातील पदार्थ हे पूर्णपणे शिजतात.
3. करोनातून बरे होऊन आल्यानंतर अशक्तपणामुळे जेवण पचायला त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या आहारात गिलके, भोपळा, पडवळ अशा भाज्यांचा समावेश करावा. कारण या भाज्यांचा पोटाला त्रास होत नाही.
4. आहारात प्रोटीन असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे प्रोटीन करिता अंडी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दिवसातून दोन अंडी खाल्ल्याने प्रोटीन मिळतेच आणि शरीराला एक ऊर्जा देखील मिळते.
5.आपल्या घरात चहाचे प्रेमी सगळेच असतात. ज्या व्यक्तींना चहा जास्त घेण्याची सवय असेल त्यांनी शक्यतो कमी करावा. नेहमी चहा बनवताना त्यात गवती चहा, आले किंवा एकतरी मिरी घालावी.
6. सर्वात महत्वाचं म्हणजे हळदीयुक्त दूध प्यावे, जर कोणाला दुधाने कफ होत असेल तर त्यांनी कोमट पाण्यात हळद टाकून प्यायले तरी चालते.
7. आपल्या आहारात दररोज फळांचा समावेश करावा. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे फळांमुळे अनेक जीवनसत्व मिळत असतात. त्यामुळे फळांचा रस प्यावा किवा फळे नियमित खात राहावे.
त्यामुळे करोनातून बरे होऊन आल्यानंतर देखील शारीरिक दृष्ट्या ठणठणीत राहण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळे निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभण्यास मदत होते.