कोरोनामुळे देशात सर्वत्र निर्बंध घालण्यात आले होती. त्यामुळे लोकांना तीन वर्षे सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता आले नाही. मात्र या वर्षी कोरोना उद्रेक दिसून येत नसल्याने, तसेच नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने लोक देखील मनसोक्त खरेदी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना मधातच पुन्हा कोरोनाचे संकट येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओमायक्रॉनचे नवे सब व्हेरिएंट बीए.५.१.७ आणि बीएफ. ७ आढळून आले आहेत. बीएफ ७ ने चीमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारतासह अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि इतर देशांमध्ये तो आढळून आला आहे. त्यामुळे आता खबरदारी घेण्याची गरज आहे. तुम्ही जर दिवाळी निमित्त घरी पार्टी किंवा फराळाचे आयोजन करण्याच्या विचारात असाल, तर या खबरदाऱ्या तुम्ही घेतल्याच पाहिजे. याने कोरोनापासून सुरक्षा मिळण्यात मदत होऊ शकते.

(लसणाचे अनेक फायदे, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या)

इनडोअर की आऊटडोअर? कोणती पार्टी सुरक्षित

२०२१ मधील एका रिव्ह्यूनुसार, आऊटडोअर पार्टीच्या तुलनेत इनडोअर पार्टीमध्ये कोरोना पसरण्याचा अधिक धोका असतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने देखील इनडोअर पार्टी करणे धोकादायक ठरू शकते. येथे लोकांना वेगळे ठवेणे कठीण जाते. तसेच आतमध्ये व्हेंटिलेशनची देखील समस्या असते, असे म्हटले आहे.

अशात कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी इनडोअर पार्टी ऐवजी आऊटडोअर पार्टी चांगला पर्याय ठरू शकते. अशी पार्टी घेताना पुढील बाबी लक्षात ठेवा.

१) मर्यादित लोकांना बोलवा

कोविड १९ संसर्गजन्य आजार आहे. खोकलणे किंवा बोलल्याने देखील ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या पार्टीमध्ये कमीत कमी लोकांना आमंत्रित करावे, याने कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकते.

(Dry Cough : कोरड्या खोकल्याने बेजार झालात? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम)

२) लक्षणे दिसल्यास दिवाळी व्हर्च्युअली साजरी करा

दिवाळी ही सर्वांसोबत साजरी करण्यात मजा येते. मात्र तुम्हाला जर कोविड १९ ची लक्षणे जाणवत असतील तर सर्वांसोबत दिवाळी साजरा न करता तुम्ही व्हर्च्युअल पद्धतीने दिवाळी साजरी करा. खोकला, ताप, छातीत वेदना, ऐकण्यात समस्या आणि वास बदलणे अशी लक्षणे दिसत असतील तर सर्वांना प्रत्यक्ष न भेटता त्यांच्यासोबत व्हर्च्युअल पद्धतीने दिवाळी साजरी करा.

३) मास्क लावा

कोविडापासून सुरक्षा देण्यात मास्क फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घरी पार्टीचे आयोजन केले असेल किंवा इतरांकडील पार्टीत जाण्याच्या बेतात असाल तर मास्क लावा. मास्क तुम्हाला कोरोनापासून सुरक्षा देऊ शकतो.

(Covid : ओमायक्रॉनच्या बी.७ व्हेरिएंटने वाढवली चिंता, छातीमध्ये वेदनेसह ‘ही’ आहेत लक्षणे)

४) सॅनिटायझरचा वापर करा

घरी पार्टीचे आयोजन केल्यास सॅनिटायझर वापरणे विसरू नका. हात धुताना साबणीचा वापर करा. स्वच्छ हात धुवा. याने कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.

५) जेवणासाठी बुफे पद्धत टाळा

पार्टी असो किंवा इतर सोहळे, जेवण चांगले असायला हवे अशी अनेकांची आशा असते. मात्र, जेवणामुळे देखील कोरोना विषाणू पसरू शकते. पार्टीमध्य बुफे पद्धत वापरण्याऐवजी प्रत्येकाला वाढण करा. याने संसर्ग वाढीला आळा बसू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)