करोना व्हायरसमुळे प्रत्येकजण घरातच आहेत. सर्व जगभर पसरलेल्या या महामारीपासून एकटेपणाचा सामना कसा करावा असा आपल्याला पडला आहे का? आपण स्वतःला समाजापासून वेगळे ठेवले आहे. कारण आपल्याला संसर्ग होऊ शकतो. आपण घरातच राहण्याचे निवडले आहे. याची अनेक करणे असू शकतात. अशा कालावधीत आपण कसे सक्रीय राहू ?
या वेगळ्या कालावधीतून जाण्याचा उत्तम मार्ग कोणता असे आपल्याला वाटते? बरं बऱ्याच योजना आहेत ज्या आपण आपल्या कल्याणासाठी अंमलात आणू शकता ; यापैकी बहुतेकांमध्ये स्वतःचे लक्ष विचलित करण्याचे मार्ग शोधणे (व्यस्त राहणे)किंवा इतरांशी संपर्क साधण्याचे मार्ग शोधणे यांचा समावेश आहे.
सक्रिय राहा : कोणताही व्यायाम न मिळाल्यास आपण १४ दिवस अलिप्तपणे घालविल्यास याचा मानसिकरीत्या सामना करण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणामकारक परिणाम होईल. तुम्ही सक्रिय राहण्यासाठी खाली दिलेल्या कुठल्याही क्रिया करू शकता
कुटुंबियांसोबत वेळ घालवा. त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारा
योगा – योगाचे विविध प्रकार आहेत. घरच्याघरी युट्युबवर व्हिडीओ लावून योग अभ्यास करू शकता.
ध्यान –
लिखाण करा –
घराची साफसफाई करा
पुस्तके वाचा
इतरांशी संपर्क साधा : १. एखाद्याच्या मोबाईलवर (भ्रमणध्वनी) कॉल करा २.फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा
गाणी ऐका .
पुरेशी झोप घ्या
पोषक अन्न घ्या
हे सगळे केल्याने तुम्ही मानसिकरीत्या खूप चांगले राहाल .सर्व लोकांच्या संपर्कात राहू शकता.
– बिन्नी गुप्ता, PR consultant