Benefits of kala chana: स्वयंपाकघरातील औषधी मसाल्यांपासून ते कडधान्य आणि भाज्यांपर्यंत आहारातील विविधता आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यातील एक महत्त्वपूर्ण कडधान्य म्हणजे काळे चणे. प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाणारे काळे चणे आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच; पण ते चवीलाही तितकेच चविष्ट असतात.
काळ्या चण्याचे दोन प्रकार आहेत, ज्यातील एक म्हणजे देशी चणे आणि दुसरे काबुली चणे. देशी जातीचे चणे गडद रंगाचे आणि बाहेरून खडबडीत दिसतात. तर, ‘काबुली’ चणे बाहेरून गुळगुळीत आवरण असलेले मोठे आणि हलक्या रंगाचे असतात.
काळे चणे खाण्याचे फायदे
देशी काळ्या चण्यामध्ये उच्च फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. काळ्या चण्यामधील विद्रव्य फायबर पित्त अॅसिड नियंत्रणात ठेवते आणि शरीराद्वारे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. सुमारे ३/४ कप चणे दररोज आहारात समाविष्ट केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसेराइड्स कमी होण्यास मदत होते.
काळ्या चण्यामधील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. हे इन्सुलिन प्रतिरोधात योगदान देते, ज्यामुळे टाईप -२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
लोहाचा समृद्ध स्रोत म्हणून काळे चणे अशक्तपणाला प्रतिबंध करू शकतात आणि आपल्या ऊर्जेच्या पातळीला चालना देण्याची क्षमता त्यामध्ये असते. हे विशेषतः गर्भवती आणि स्तनपान करणार्या महिलांसाठी, तसेच वाढत्या मुलांसाठी फायदेशीर आहे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोह महत्त्वाची भूमिका बजावते, जे फुप्फुसांपासून शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.
फायबर पाचक मार्ग निरोगी ठेवते म्हणून पचनविकारांवर उपचार करण्यास ते मदत करते. आतड्यांवरील ताण कमी करून, फायबर बद्धकोष्ठतेचा धोका कमी करते. बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी रात्रभर पाण्यात चणे भिजवा आणि जिंजर पावडर व जिरा टाकून, सकाळी ते खा.
त्याव्यतिरिक्त हे त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. कारण- पेशींना ऊर्जा देणार्या मँगनीजच्या उपस्थितीमुळे वृद्धत्वाशी लढायला मदत मिळते.
काळे चणे चेहरा स्वच्छ करण्यासाठीही वापरले जाऊ शकतात. त्यासाठी हळदीमध्ये चण्याची पेस्ट मिसळा आणि हे मिश्रण सकाळी तुमच्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे तसेच सोडून, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय चेहरा उजळवसही मदत करतो.
शरीरातील मँगनीजच्या कमतरतेमुळे केसांची वाढ कमी होऊ शकते. चणे केसगळतीसाठीही फायदेशीर ठरू शकतात.