Lips Care In Winter: हिवाळा येताच, कोरडी आणि थंड हवा त्वचेवर परिणाम करते. त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असताना, नाजूक ओठ देखील फाटतात. कधीकधी कोरडे ओठांची त्वचा निघते आणि त्यातून रक्त देखील वाहू लागते. अशा परिस्थितीत लोक विविध प्रकारचे लिप बाम लावून ओठ मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे सर्व ओठांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही. अशा परिस्थितीत काही खास टिप्स अवलंबून तुम्ही हिवाळ्यातही तुमचे ओठ कोमल आणि मुलायम ठेवू शकता. अशा टिप्सबद्दल जाणून घेऊया.
हिवाळ्यात ओठ कसे मऊ ठेवावे
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे ओठ कोरडे पडतात. त्यांच्यावर एक कडक त्वचेचा पापूद्रा तयार होतो तयार होऊ लागते. अशा परिस्थितीत ओठ ओले करण्यासाठी ओठांची साल काढण्याची किंवा चावण्याची किंवा चाटण्याची चूक करू नये. यामुळे ओठ आणखी कोरडे होऊ लागतात.
हिवाळ्यात ओठांची कोरडी त्वचा काढून टाकण्यासाठी तुम्ही वेळोवेळी एक्सफोलिएट करा. आठवड्यातून एकदा एक्सफोलिएट केल्याने ओठांवरची मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावेत आणि त्यावर चांगला लिप बाम लावावा. हे रात्रभर तुमच्या ओठांना पोषण देईल आणि दिवसा त्यांना फाटणे टाळू शकते.
मीठ, साखर, मध आणि तेल एकत्र करून तुम्ही घरच्या घरी एक अद्भुत आणि नैसर्गिक लिप स्क्रब बनवू शकता. यामुळे तुमच्या ओठांची मृत त्वचा निघून जाईल.
हेही वाचा – स्वयंपाक करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ सोप्या टिप्स! तुमचा वेळ आणि कष्ट वाचवा, आरोग्याचीही घ्या काळजी
ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्याअभावी ओठ कोरडे होणे ही सामान्य बाब आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर तुमचे ओठ हायड्रेट राहतील.
जर तुम्ही हिवाळ्यात बाहेर जात असाल तर ओठांवर लिप बामसोबत सनस्क्रीन लावा.