गावाकडुनं येणारा प्रत्येक जीव मैनेंचा उंचवला हात याद करत मुंबई कवटाळायला आला..
..हि मुंबई यंत्रांची..हडसनच्या गाडीची.
पाण्यानं भरलं खिस माझं…वाण मला ऐका छत्रीची..
आमच्यातल्या प्रत्येकाने ही छत्री हरवतांनां बघितलंय …गिरणीं कामगारांना मिळणारी अनुकंपा घरं अन् त्यासाठी आजोबांचे पुरावे गोळा करणारी आमची पिढी..आजोबा अन् आजोबांची धुरकट मैनां..अंतरीचा हा जाळ वस्त्या वस्त्यानं मध्ये आजही धुमसतोय….गिरण्या गेल्या..माॅल आले.. स्थानिक हरवले रोजगारांसकट.. सारे बलुतेदार रंगात माखले..मोर्चे.. आंदोलन.सोळा तुन पन्नाशी पर्यंत चिखलच चिखल.. पन्नाशीला पाठी वळून पाहताना मैनां तशीच हतबल…मुबंईत गर्दी बेकारांची..भरती झाली माझी एकाची…..न संपणार दॄष्टचक्रं..पण अण्णाभाऊंनी बजावलं होतं …ही मुंबई यंत्रांची ‌‌..हडसनच्या गाडीची . हाच धागा पकडत..मैनेच्या आजोबांचा हा.. पणतु.. डॉ. विजय विचारे.. महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी स्वंयरोजगार घेऊन आलाय..शिकुन..आरक्षंण वा नोकरीसाठी सरकार कडे अपेक्षा ठेवणांरया हया पिढीत,आपलाच रोजगार निर्माण करून ताठ उभं राहण्याचा पर्याय…Speed and Spark ..स्वःच गाडीचे मालक होऊन स्वःताचा व्यवसाय..बेकारीला संपवत..मैनेला सुखावत..कर्तबगार पिढीची सुरुवात.वाहतुक व्यवसाय कैक देशांचा आर्थिक कणां ठरत असतानां आपणं मागे का राहयच..आभाळा कडे पाहत त्याला कवेत नाही घेता येत.. प्रवासाला निघायलाच हवं..वास्को दि गामा..कोलंबस..अपयशी कधी होते..प्रवास…वाहतुक.. अन् हाती लागलेले यश..भारत.. अमेरिका…आपण सुरवात करुया..प्रवासाला निघाल्यावर मुक्काम सापडतोच.. मैनेला बरोबर घेऊन…

सतीश जाधव

आरेखन

स्पीड अँड स्पार्क

(प्रायोजित)