दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्याला मध्ये आवर्जून भूक लागते. ही संध्याकाळची छोटीशी भूक शमविणे गरजेचे असते. यासाठी जास्त हेवी किंवा अगदीच पोटभरीच असं काही खाऊ वाटत नाही. अशावेळी आपण सगळेच झटपट तयार होईल आणि भूक मिटवेल अशा पदार्थांच्या शोधात असतो. अशाच एका झटपट होणाऱ्या आणि चवीला चटपटीत असणाऱ्या बटाट्याच्या रिंग्जची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा स्नॅक्स तुम्ही सहज बनवू शकता.
जाणून घ्या रेसिपी
१. प्रथम एका पॅनमध्ये थोडे बटर, लसूण, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाका.
२. नंतर ते परता आणि शिजल्यावर त्यात थोडे पाणी घालावे.
३. उकळी येऊ द्या, त्यात रवा घाला. नीट मिक्स करून घ्या. नंतर रवा पाण्यात भिजवल्यावर थंड होण्यासाठी ठेवा.
(हे ही वाचा: Photos: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ चार पेयांचे सेवन!)
४. यानंतर दोन मॅश केलेले बटाटे घालून पीठ मळून घ्या.
५. हे पीठ सपाट करून कटरच्या साहाय्याने लहान रिंग कापून घ्या. किंवा तुम्ही त्यापासून लांब पट्ट्या देखील कापू शकता आणि नंतर त्यातून एक वर्तुळ बनवू शकता.
६. या रिंग्सला थोडे कॉर्नफ्लोअर लाऊन घ्या आणि तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.