आहारात दररोज दही खाल्याने उच्चरक्तदाब नियंत्रणात येतो असे एका अभ्यासादरम्यान सिद्ध झाले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासात दीर्घकाळ आहारात दही खाणा-या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, असे म्हटले आहे.
यासाठी १५ वर्षांच्या कालावधीत तज्ज्ञांनी २००० लोकांवर परीक्षण केले. या लोकांना प्रश्नावली देण्यात आली होती. त्या प्रश्नांवलीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या ३१ टक्के लोकांना आहारात दह्याच्या समावेशानंतर उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी झाल्याचे परीक्षणाअंती सिद्घ झाले. तर बाकीच्या ज्या लोकांनी दह्याचा समावेश आहारात केला नाही त्यांचा उच्च रक्तदाब वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in