कडीपत्ता तुळस या वनस्पतींना औषधी वनस्पती माणलं जातं. या वनस्पतींचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. तुळस जशी आरोग्यासाठी गुणकारी आहे, तसाच कढीपत्ता देखील अनेक गुणांनी समृद्ध आहे. कढीपत्ता सर्वात जास्त वापर हा जेवणासाठी केला जात असला तरी तो आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. शिवाय कढीपत्त्याचा चहा देखील बनवला जातो आणि तो आरोग्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे हा चहा कसा बनवतात आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

कढीपत्याचा वापर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आता संपुर्ण देशभरात कढीपत्याचा वापर वाढला आहे. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, अशा प्रकारची पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. तर कढीपत्त्यामधील कॅल्शियम तुमच्या हाडांसाठी देखील उपयुक्त असतं. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा पिणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
This is what happens to the body when you drink amla water first thing in the morning every day
रोज सकाळी उठताच आवळ्याचे पाणी प्यायल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Kitchen Jugaad How to store fresh curry leaves brought from the market for 20-25 days
Kitchen Jugaad : बाजारातून आणलेला ताजा कढीपत्ता २०-२५ दिवस कसा साठवावा? जाणून घ्या सोपा उपाय, पाहा Video

आणखी वाचा- बदाम, काजू आणि पिस्ता किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य मात्रा

Hindustantimes.com ने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, कढीपत्त्यामध्ये सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असते. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. तसेच गॅस, जुलाब, बद्धकोष्ठता, अशा अनेक समस्या देखील कमी होतात.

मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हा चहा फायदेशीर –

अनेक लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असतात. त्यांना आपली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पण ते लोक चहा प्यायल्याने देखील साखर नियंत्रणात ठेवू शकतात. असं तुम्हाला सांगितलं तर ते पटणार नाही. मात्र, ते शक्य आहे, जर तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचा चहा पिला तर हा चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, तो चहा साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.

त्वचेसाठीही लाभकारी –

कढीपत्ता आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. त्याचा वापर केल्याने त्वचा तेजस्वी होते सोबतच मुरुमांचा त्रास देखील दूर होतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये उच्च पातळीचे फिनॉलिक्ससह अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे त्वचेच्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर एक कप कढीपत्त्याचा चहा नियमित प्यायला हवा.

आणखी वाचा- नैराश्य-चिंता दूर करण्यासाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ ठरतेय उपयुक्त? काय सांगतो संशोधन, पाहा एकदा रिपोर्ट!

कढीपत्त्याच्या चहाचे सेवन हे गरोदरपणातही केलं जाऊ शकतं. हा चहा पिल्याने तुम्हाला होणारा उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास जाणवणार नाही. शिवाय हा चहा प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान पिला तरी प्रवासात थकवा येणार नाही आणि उलट्यांचा त्रास देखील होणार नाही. कढीपत्त्याचा सुगंध हा मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल तर थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी हा चहा ट्राय करायला हरकत नाही.

असा बनवा चहा –

चहा बनवण्यासाठी २० ते २५ ताजी कढीपत्ता पाने घ्या, ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि ते पाणी गॅसवर उकळा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता पाने टाका आणि ती थोडावेळ झाकून ठेवा. तुम्हाला चहात गोडवा हवाच असल्यास थोडासा गुळ वापरा पण साखरेचा वापर टाळा. काही वेळ चहा गॅसवर उकळा त्यानंतर पाण्याचा रंग बदलेल आणि मग तुम्ही आरोग्यदायी असा चहा प्या आणि निरोगी रहा.

Story img Loader