हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला की थंडी जाणवू लागते. हिवाळ्यात थंडीसोबत प्रदूषणाचे आगमनही होते. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या श्वसनाच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे लोकांचा श्वास गुदमरतो. या ऋतूत आहारात ठराविक पदार्थांचे सेवन केल्यास हवामानाचा त्रास टाळता येतो. सीताफळ हे थंड वातावरणात आढळणारे फळ आहे जे फुफ्फुसांचे आरोग्य वाढवते आणि त्यासंबंधित समस्या दूर करते. खायला चविष्ट असणारे हे फळ दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. या फळाचे सेवन केल्याने फुफ्फुसे नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात.

सीताफळ वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रभावी असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. या फळाबरोबरच त्याची मुळं, पाने, साल या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म आहेत ज्यांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हृदयविकारापासून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फळ फायदेशीर आहे . चला जाणून घेऊया हे फळ फुफ्फुसांच्या स्वच्छतेसोबतच शरीराला काय फायदे देते.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

( हे ही वाचा: हिवाळ्यात काही लोकांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या यामागची गंभीर कारणे)

मधुमेह नियंत्रित करते

१०० ग्रॅम सीताफळामध्ये एकूण ९४ कॅलरीज असतात. प्रथिने २.१ ग्रॅम, आहारातील फायबर ४.४ ग्रॅम, एकूण चरबी ०.० ग्रॅम आणि कार्बोहायड्रेट २३.६ ग्रॅम असतात. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५४ आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. मधुमेही रुग्ण हे फळ आरामात खाऊ शकतात.

स्नायूंमधील कमजोरपणा दूर करते

या फळातील कॅलरीज एका सफरचंदापेक्षा दुप्पट असते ज्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. हे फळ पोटॅशियमने समृद्ध आहे, जे स्नायूंच्या कमकुवतपणापासून मुक्त होण्यास आणि ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत करते.

( हे ही वाचा: मधुमेहामुळे डेंग्यूचा धोका वाढतो का? जाणून घ्या रक्तातील साखरेशी असलेला याचा संबंध)

रक्तदाब नियंत्रित करते

सीताफळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित आहे जे शरीरातील रक्ताभिसरणातील चढउतार नियंत्रित करण्यास मदत करते. एक छोट्या सीताफळात मॅग्नेशियमसाठी सुमारे १० टक्के RDA मिळते, ज्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

Story img Loader