चुकीचे खानपान आणि जीवनशैलीमुळे बहुतेकजणांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला चरबी जितक्या वेगाने वाढते, ती कमी करणे तितकेच कठीण आहे. जर तुम्हीसुद्धा वजन आणि चरबी वाढण्याच्या समस्येने हैराण आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी जिममध्ये केलेला वर्कआऊट जितका फायदेशीर आहे तितकाच फायदा सायकल चालविल्याने होतो. सायकल चालविल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, मांसपेशी मजबूत होतात आणि बॉडी फॅट कमी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी व्यायामाद्वारे आठवड्यातून किमान २ हजार कॅलरीज बर्न कराव्यात आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्थिर आणि नियमित सायकल चालवल्याने प्रति तास ३०० कॅलरीज बर्न होतात. अशा परिस्थितीत तुम्ही जितकी जास्त सायकल चालवाल तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतील आणि शरीरातून फॅट कमी होईल. मात्र यासाठी सायकल चालवण्यासोबतच आरोग्यदायी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पोहे आहेत एक आरोग्यदायी नाश्ता; याचे ‘हे’ पाच फायदे तुम्हालाही नसतील माहित

अशाप्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा समावेश करा

  • बाजारात सामान आणण्यासाठी, ऑफिसला किंवा शाळेत जाण्यासाठी सायकलचा वापर करा.
  • कॅलरीज बर्न करण्यास मदत करण्यासोबतच, सायकल चालवल्याने अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येते.
  • सायकलिंग करून तुम्ही हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, नैराश्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.
  • सायकलिंग हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेऊ शकतात.
  • सायकलिंगमुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यासारखे मानसिक आरोग्याचे आजार देखील कमी होतात.

अचानक का गळू लागतात पुरुषांचे केस? जाणून घ्या यावरील उपचार

दररोज किती वेळी सायकल चालवली पाहिजे?

सायकलिंग ही केवळ एक मजेदार क्रिया नाही, तर तुमचे स्नायू बळकट करण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की दररोज एक तास सायकल चालवून तुम्ही ३०० कॅलरीज बर्न करू शकता. आरोग्य तज्ञ दररोज ३० ते ६० मिनिटे सायकल चालवण्याचा सल्ला देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycling for every day will reduce belly fat get rid of many serious ailments pvp