D-tan Face With Curd: कोणताही ऋतु असो, त्वचेची काळजी घेणे नेहमीच आवश्यक असते. कारण धूळ आणि प्रदूषणामुळे अनेकदा टॅनिंगची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत स्त्रिया त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उपचार ट्राय करतात. त्यापैकी एक म्हणजे डी-टॅन. डी-टॅन तुमची त्वचा उजळ करते. त्वचेला डि-टॅन करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, पण त्याचा त्वचेला कितपत फायदा होईल याची शाश्वती नाही. पण तुम्ही नैसर्गिक घटकांच्या मदतीने टॅनिंग कमी करू शकता. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात असे साधे पदार्थ सहज सापडतील ज्याचा वापर करून तुम्ही डी टॅन पॅक घरी तयार करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हीही डी-टॅनसाठी दर महिन्याला पार्लरमध्ये जात असाल तर आतापासून असे करण्याची गरज भासणार नाही, कारण आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींनी त्वचा डि-टॅन कशी करायची ते सांगणार आहोत. दही वापरून तुम्ही त्वचा डि-टॅन करू शकता. त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

डी टॅन पॅक कसे काम करते?

टॅनिंगमुळे त्वचेच्या मृत पेशींच्या थरांमध्ये वाढ होण्यासह पिगमेंटेड पेशींचा संचय होतो. परिणामी, त्वचा काळी, निस्तेज, कोरडी आणि जाड दिसते. डी टॅन पॅक, क्रीम इ. सारख्या टॅन काढण्याच्या उत्पादनांचा स्थानिक वापर त्वचेचे गडद ठिपके हलके करण्यास आणि त्वचेच्या पोत सुधारण्यास मदत करू शकतो.

दह्याने त्वचा डी टॅन करा

दही आणि बेसन- चेहऱ्याला डी टॅन करण्यासाठी तुम्ही दह्यात बेसन मिसळून लावू शकता. दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळा. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. मिश्रण सुकल्यावर कापसाच्या साहाय्याने स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही सुटका मिळेल. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. यामुळे त्वचेला ओलावाही मिळतो.

गुलाब पाणी आणि दही –

चेहरा डी टॅन करण्यासाठी तुम्ही गुलाब पाणी आणि दही वापरू शकता. यासाठी दह्यात दोन ते चार चमचे गुलाबजल मिसळा, हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा, सुमारे २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा, त्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.

हेही वाचाटोमॅटोनंतर आता महागले आले! आता घरच्या घरी आले कसे लावावे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

दही आणि कॉफी –

कॉफीमध्ये दही मिसळून फेस पॅकही बनवू शकता. कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करते. यामध्ये असलेले कण चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतात. चेहरा प्रदूषणमुक्त होतो. एक चमचा दह्यात अर्धा चमचा कॉफी मिसळा आणि चेहरा स्क्रब करा. ही पेस्ट काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D tan face with curd homemade d tan face pack for dark tan skin know the process skin care srk
Show comments