IRCTC Dakshin Bharat Package: एकीकडे, IRCTC हे देश आणि परदेशात हवाई टूर पॅकेजेस उपलब्ध करून देत असते, तर दुसरीकडे, देशातील विविध पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांसाठी टूर पॅकेजेस देखील सुरू करते. या क्रमवारीत, भारत सरकारच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” आणि “पाहा आपला देश” योजनेंतर्गत, IRCTC ने गोरखपूरवरुन भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे दक्षिण भारताच्या टूर पॅकेज सुरु करण्यचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधीत ही टूर पॅकेज सुरू करणार आहे. या टूरमध्ये तुम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, तिरुपती बालाजी मंदिर, रामनाथ स्वामी मंदिर (रामेश्वरम), मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारी या ठिकाणांना भेट देऊ शकता.

या स्थानकांवरून केली आहे चढण्या – उतरण्याच्या सुविधा

गोरखपूर, बस्ती, मानकापूर जंक्शन, अयोध्या कॅंट, सुलतानपूर, प्रतापगढ, प्रयागराज संगम, उंचाहर जंक्शन, रायबरेली जंक्शन, लखनऊ, कानपूर, वीरांगना लक्ष्मीबाई स्टेशन येथून प्रवासी IRCTC द्वारे या ट्रेनमध्ये चढू शकतात.

Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
Vande Bharat pune, special train pune, pune train,
पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Sunday Block on Central Railway, Railway Block,
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार

हेही वाचा : कमी खर्चात घ्या अयोध्या आणि वैष्णोदेवीचे दर्शन! रेल्वेने दिली सुवर्णसंधी, फक्त ‘एवढे’ भाडे भरा

या ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत

या टूर पॅकेज दरम्यान, पर्यटकांना मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, तिरुपती बालाजी मंदिर, मीनाक्षी मंदिर, मदुराई, रामनाथ स्वामी मंदिर, रामेश्वरम आणि कन्याकुमारीच्या स्थानिक प्रेक्षणीय स्थळांवर नेले जाईल.

कर्मचारी आणि भाडे

या पॅकेजमध्ये ट्रेनचा प्रवास, तीन वेळेच्या जेवणासोबत हॉटेलमध्ये राहण्यासाठी आणि बसमध्ये स्थानिक प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. या टूर पॅकेजच्या किंमतीबाबत सांगायचे झाले तर तर इकोनामी श्रेणी (Sleeper Class) मध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत २१,०१० रुपये प्रति व्यक्ती होईल आहे. आणि प्रत्येक लहान मुलासाठी पॅकेजची किंमत १९,७८३ रुपये होईल.

स्टँडर्ड वर्गातील दोन किंवा तीन व्यक्तींच्या एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत (३AC वर्ग) प्रति व्यक्ती रु. ३५,४०८ आहे आणि एका लहान मुलासाठी (५-११ वर्षे) पॅकेजची किंमत रु. 33,964 आहे.

कम्फर्ट श्रेणी ( २ एसी क्लास) मध्ये दोन या तीन व्यक्तींच्या एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत ४७,०३३ रुपये प्रति व्यक्ती आणि (५-११ वर्ष) या पॅकेजची किंमत ४५,३०० रुपये आहे.

हेही वाचा : चार दिवस फिनलँडमध्ये फिरा, आनंदी कसे रहावे शिका सर्व काही मोफत! फक्त अट इतकीच आहे की…

EMI च्या माध्यमातून देखील करू शकता

या टूर पॅकेजचा लाभ घेण्यासाठी आईआरसीटीसीद्वारे ईएमआयची सुविधा, आईआरसीटीसीवर उपलब्ध १४ सरकारी आणि गैर सरकारी बँकांकडून घेतली जाऊ शकते. तुमची बँक ऑफ बड़ौदा २४ महिने कालावधीसाठी, एसबीआय बँक १२ महिन्यांच्या कालावधीसाठी आणि एचडीएफसी बँक १८ महिन्यांच्या कालावधीसाठी कमी दरात ईएमआयची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

या बँकांमध्ये सुविधा मिळू शकते ईएमआयची सुविधा

इच्छुक यात्री अमेरिकन एक्सप्रेस, एक्सिस बँक, सिटी बँक, फेडरल बँक, एचएसबीसी बँक, आईसीआयसी बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक, चार्टर्ड बँक आणि या बँकेतून ईएमआयची सुविधा मिळू शकते.

कसे बुक करायचे

या टूर पॅकेजची माहिती देताना, IRCTC नॉर्दर्न रिजनचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, या पॅकेजचे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. या प्रवासाच्या बुकिंगसाठी, तुम्ही पर्यतन भवन, गोमती नगर, लखनऊ येथील IRCTC कार्यालय आणि IRCTC वेबसाइट http://www.irctctourism.com ला भेट देऊ शकता.