बदलत्या ऋतूमुळे, प्रदूषणामुळे केसांवर खूप परिणाम होतो. त्यामुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांमुळे केसांची वाट लागते आणि केस विचित्र दिसू लागतात. केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांमधील कोंडा आहे. केसांमधील कोंड्यामुळे केस गळणे, टाळूवर खाज येणे असे त्रास होऊ लागतात. त्यामुळे केसांची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांपासून मुक्त होणे सहसा सोपे नाही. म्हणूनच प्रत्येकजण रासायनिक उत्पादनांचा अवलंब करतात. मात्र, प्रत्येकवेळी रासायनिक उत्पादनांचा वापर न करता तुम्ही काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय ज्यामुळे तुम्ही केसांसंबंधीत असलेल्या समस्या दूर करू शकता.
केसांच्या समस्यांवर घरगुती उपाय
१) मेथीचे पाणी
मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.याशिवाय, ते पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांचे स्त्रोत आहेत. केसांना लावण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी स्प्रे बाटलीत भरून ठेवा. त्यानंतर ज्या वेळी तुम्ही केस धुवाल, त्या वेळी केस धुण्याच्या ३० मिनिटे आधी केसांच्या मुळांवर हा स्प्रे करा.
( हे ही वाचा: Hair Care: पावसाळ्यात केसांना दुर्गंधी येतेय?; हे घरगुती उपाय करा, वेळीच सुटका मिळेल)
२) तांदळाचे पाणी
कोरियन ब्युटी टिप्समध्ये तांदूळ आणि तांदळाचे पाणी वापरले जाते .या पाण्यात अमीनो अॅसिड आणि जीवनसत्त्वे बी, सी, ई समृध्द असतात. ते वापरण्यासाठी, सर्वप्रथम तांदूळ ३ ते ४ भिजवा आणि नंतर त्याचे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. नंतर हे पाणी केस धुण्यापूर्वी टाळूवर लावा. हे पाणी केसांच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
३) कोरफड
एलोवेरा जेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तुम्ही कच्च्या कोरफडीचे जेल थेट तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावू शकता. आपल्या टाळूवर, केसांवर आणि टोकांना आपल्या हातांनी कोरफडीचा गर लावा. कोरफड जेल सुमारे ३० मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर धुवा.
पाहा व्हिडीओ –
( हे ही वाचा: Hair Care: केसांना चमकदार बनविण्यासाठी ‘या’ हेअर मास्कचा वापर करा; जाणून घ्या कसे बनवायचे)
४) दही आणि मोहरीचे तेल
हा हेअर मास्क केसांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ई, फॅटी अॅसिड आणि ओमेगा भरपूर आहे. ते लावण्यासाठी दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि नंतर केसांना चांगले लावा. सुमारे १५ मिनिटं केसांवर हा मास्क राहू द्या आणि सुकल्यानंतर केस धुवा. पावसाळ्याच्या दिवसात केसांसाठी हा हेअर मास्क खूप फायदेशीर आहे.