Dandruff home remedies: हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला केसातील कोंड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. केसात कोंडा झाला आणि त्यावर काहीही उपाय केले नाही तर यामुळे केस गळती होऊ शकते. तुम्ही जर अनेक शाम्पू, हेअर ऑईल, हेअर सिरम आणि हेअर मास्क ट्राय केले असतील आणि त्याचा परिणाम तुमच्या कोंड्यावर झाला नसेल तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोंड्याच्या या त्रासापासून मुक्तता मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घरी पूजेसाठी लागणारा कापूर तुमच्या कोंड्याला झटक्यात दूर करू शकतो. तुम्हाला माहीत आहे का की कापूरमध्ये आढळणारे सर्व घटक तुमच्या केसांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात? कोंडा दूर करण्यासाठी कापूरदेखील वापरता येतो. कापूरमध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म केसांशी संबंधित काही समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात. केसांची निगा राखण्यासाठी कापूरचा वापर नेमका कसा करावा, ते जाणून घेऊया…

हेही वाचा… गिझरचा स्फोट होऊन नववधूचा मृत्यू! असा भयंकर अपघात टाळण्यासाठी ‘या’ सामान्य चुका टाळा

कापूर, खोबरेल तेल आणि लिंबाचा रस (How to get rid of Dandruff)

केमिकलमुक्त हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्हाला कापूर, खोबरेल तेल आणि लिंबाचा रस लागेल. हे तीन नैसर्गिक घटक चांगले मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता तुम्ही या हेअर पॅकचा तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी वापर करू शकता.

कापूर आणि ऑलिव्ह ऑइल

कापूर पावडर थोड्याशा कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही कापूरपासून बनवलेली पेस्टही वापरू शकता.

कापूर आणि रीठा

प्रथम रीठा रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी उकळवा. आता कापूर आणि उकळवलेला रीठा मिक्स करून त्याचा हेअर पॅक तयार करा. हा नैसर्गिक हेअर पॅक तुम्ही डोक्याला लावू शकता.

हेही वाचा… Jaswand Flower Tips: जास्वंदीला येतील भरपूर कळ्या, केळीच्या सालीबरोबर मिसळा ही गोष्ट, पैसे वाचवणारा VIDEO एकदा पाहाच

जर तुम्ही वेळीच कोंड्याच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला लवकरच केस गळतीला सामोरे जावे लागू शकते. एकूणच, पूजेसाठी वापरण्यात येणारा कापूर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. जर तुमच्या कोंड्याची समस्या वाढतच राहिली तर डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या)