चॉकलेटकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. चॉकलेट खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे.
चॉकलेटमुळे शरिरातील धमन्या अधिक लवचिक होण्यास मदत होते. तसेच हृदयाशी जुळणाऱया रक्तवाहिन्यांमध्ये कोणताही अडथळा निर्माण न होण्यासाठीही चॉकलेट मदत करत असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.
चॉकलेटच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल चिकटून राहत नाही. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठ्यात अडचणी निर्माण होत नाहीत परंतु, याची व्यापकतेवर अजूनही प्रश्नचिन्हे आहेत. बाजारात आज वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स उपलब्ध आहेत. गडद चॉकलेट्स हृदयासाठी चांगले असतात असा दावा संशोधकांनी केला आहे. इतर चॉकलेट्सच्या प्रकारांबाबतीत शंका आहेत. तसेच चॉकलेट खाल्ल्याचा हा एक फायदा जरी असला तरी, याचे इतर अवयवांना घातक ठरणारे दुष्परिणामही आहेत. उदा. दातांचे किडणे इत्यादी.
तरीही हृदयासाठी चांगले ठरणाऱया चॉललेटच्या या एका फायद्याने चॉकलेट प्रेमींसाठीही आनंदाची गोष्ट आहे.

Story img Loader