खजूर हा खाण्यास जितका गोड आहे, तितकेच त्याचे फायदे आहेत. लहान दिसणारा हा खजूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका छोट्या खजुराचे नियमित सेवन केल्यास अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करता येते. तसेच आहारात या खजुराचे सेवन कसे करावे हे ठरवावे. असे मानले जाते की रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आजारांमध्ये खजूर फायदेशीर आहे.

हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते

जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाण्याची सवय लावा. असे मानले जाते की खजूर शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून अॅनिमियाची समस्या दूर करते. तसेच खजूरमध्ये लोह चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Indian dals ranked based on their protein content
Indian Dals : मूग, मसूर, उडीद डाळ, कोणत्या डाळीतून किती मिळते प्रोटीन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
healthy lifestyle
महिनाभर गोड खाऊ नका, नियमित १० हजार पावले चाला अन् फक्त घरचं अन्न खा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या, आरोग्यावर कसा होईल सकारात्मक परिणाम
hing and jeera tadka in pulses beneficial for health
डाळीतील हिंग आणि जिऱ्याचा तडका आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
social media impact on helth marathi news
Health Special : सोशल मीडियाच्या आक्रमणात आपलं आरोग्य कसं जपावं?

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर

याशिवाय ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा काही लोकांना त्याचा त्रास होत आहे, त्यांनी आजपासून रोज रिकाम्या पोटी खजूर खावे. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. आरोग्य तज्ञांच्या मते, खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर करते.

ही लोकं सुद्धा खजूराचे सेवन करू शकतात

गोड खाण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत खजूर खाणे खूप फायदेशीर मानले जाते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरोदर महिलांनीही योग्य प्रमाणात खजूर खावे.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Story img Loader