Long Distance Relationship : आजच्या काळात लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये असणे अगदी सामान्य गोष्ट आहे. कित्येकदा रिलेशनशिपमध्ये असताना कधी नोकरीसाठी, कधी शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कारणामुळे जोडीदारांना एकमेकांपासून दूर राहावे लागते. असे नाते टिकवणे दोघांसाठी खूप अवघड असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आजकाल व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करून जोडीदारांना एकमेकांच्या संपर्कात राहणे शक्य झाले आहे पण नात्यामध्ये प्रेम टिकवणे तितकेच अवघड आहे. एकमेकांपासून दूर असताना, जोडीदारासोबत भावनिक आणि शारीरिक संबध ठेवण्याच्या एखाद्याच्या क्षमतेला रिमोट इंटमेसी असे म्हणतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नातं आणखी दृढ करण्यासाठी आणि नात्याला आणखी सुंदर करण्यासाठी खाली दिलेल्या टीप्स फॉलो करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतत संवाद साधणे

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत सतत सवांद साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. नात्यामध्ये एकमेकांसोबत फोटो शेअर करणे, एकमेकांना व्हिडिओ कॉल करणे अशा गोष्टी केल्यामुळे नात्यातील प्रमे वाढते. तुमच्या जोडीदाराला चांगले स्नॅपशॉट आणि व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत आहात हे जाणवू द्या. जोडीदारासोबत असताना संपूर्ण लक्ष त्याच्याकडे असू द्या. तुमचा फोन बाजूला ठेवा आणि त्याच्यासोबत गप्पा मारा आणि एकमेकांच्या आयुष्याबाबत जाणून घ्या.

हेही वाचा : कोकम आहे उन्हाळ्यातील Super Fruit! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, जाणून घ्या फायदे

एकमेकांना आपले अनुभव सांगणे

तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी तुम्ही अत्यंत प्रभावी गोष्ट जर कोणती करू शकत असाल तर ती म्हणजे तुमच्या जोडीदाराला तुमचे नव-नवीन अनुभव सांगणे. एकमेकांना अनुभव सांगितल्यामुळे तुमचं नात आणखी मजबूत होते आणि तुमच्या नात्यामध्ये संवाद सुरू करण्यासाठी मदत करते पण त्यासाठी तुम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये मनापासून सहभागी झाले पाहिजे.

नात्यामध्ये एकमेकांवर प्रेम करत राहा

तुमच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत चांगले नातं तयार करणे अत्यंत गरजेचे असते मग भलेही ते भावनिक असो किंवा, शारीरिक. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भावनिक आणि शारीरिक संबध निर्माण करून तुमच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण करू शकता आणि नात्याला टिकविण्यासाठी प्रेरणा मिळवू शकता. तुमच्या नात्यातील प्रत्येक टप्पा अनुभवा आणि आनंदाचे क्षण साजरे करा आणि दुख:मध्ये एकमेकांना धैर्याने सांभाळा

हेही वाचा : सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

प्रयत्न करत राहा

आजच्या काळात प्रत्येक जण व्यस्त असतो आणि हे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर तुमच्या हातात असलेल्या वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे आणि तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढला पाहिजे. यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो आणि सतत त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतात पण हे सर्व प्रयत्न सार्थ ठरतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याचे असण्याचे महत्त्व पटवून देणे आणि तुम्ही त्यांच्याप्रती एकनिष्ठ आहात याची जाणीन करून द्यावे लागते जेणे करुन तुमचे नातं आणखी दृढ होईल. तुमच्या नात्यामध्ये एकमेकांनासाठी कृतज्ञता आणि आदर दाखविला पाहिजे आणि दोघांना एकमेकांसाठी वेळ काढून नातं जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वचन

नातेसंबंधातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे वचनबद्धता आणि तुमच्या जोडीदारासोबत आणि स्वतःसोबत वेळ घालवणे. या दोन गोष्टींमुळे तुमचं रोमँटिक नातं चांगले राहू शकते किंवा खराब होऊ शकते. नात्यामध्ये असले तरी तुमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी, तुम्हाला नात्याबाबत समाधानी वाटण्यासाठी आणि लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारण्यासाठी, तुमच्या स्वतःच्या वेळेला प्राधान्य द्या आणि स्वतःची काळजी घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dating tips effective ways to build and maintain intimacy in long distance relationship snk
Show comments