Relationship Tips : सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. बदलत्या काळानुसार हल्ली सासू-सुनेच्या नात्यामध्येही बदल दिसून येत आहे. त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत. आज आपण सासू-सुनेचे नाते कसे घट्ट करायचे आणि नात्यातील सलोखा कसा वाढवता येईल, हे पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदर करा

कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप जास्त गरजेचे आहे. सासू-सुनेच्या नात्यातही तसेच आहे. सुनेने सासूचा आदर केला पाहिजे आणि आणि सासूने सुनेला मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे..

हेही वाचा : Astrology : रिलेशनशिपमध्ये खूप प्रामाणिक आणि भावनिक असतात ‘या’ तीन राशीचे लोक; तुमच्या पार्टनरचे नाव यात आहे का?

शांतताप्रिय असणे

प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे मतभेद होणे साहजिकच आहे. जर सासू अन् सुनेला एकमेकांचे विचार पटले नाहीत, तर शांतपणे चर्चा केली पाहिजे. एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे गरजेचे आहे. शांतताप्रिय स्वभाव सासू-सुनेच्या नात्याला आणखी घट्ट करतो.

एकमेकींची प्रशंसा करा

सासू-सुनेच्या नात्यात एकमेकांची प्रशंसा करणे खूप जास्त गरजेचे आहे. सासूने सुनेची प्रशंसा केली, तर सुनेला तिच्याविषयी आपुलकी वाटू शकते आणि नात्यातील सलोखा वाढू शकतो. सुनेनेसुद्धा सासूविषयी चुकीचे बोलू नये. इतरांजवळ दोघींनीही एकमेकींची निंदा करू नये.

हेही वाचा : Tea At Evening : चहाप्रेमींनो, संध्याकाळी चुकूनही घेऊ नका चहा; नाही तर भोगावे लागू शकतात हे गंभीर परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात …. 

मुलीप्रमाणे वागणूक द्या

सून ही आई-वडिलांचे घर सोडून परक्या घरी येते. अशा वेळी सासूने तिला समजून घेतले पाहिजे आणि मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. मुली आणि सुनेमध्ये कधीच भेद करू नका. दोघींना समान वागणूक द्या. सुनेनेसुद्धा सासूवर आईसारखे प्रेम केले पाहिजे, तरच सासू-सुनेच्या नात्यात दूरावा निर्माण होणार नाही.

एकमेकींची काळजी घ्या

असे म्हणतात की, जिथे काळजी तिथे प्रेम असते. जर नात्यात एकमेकांविषयी काळजी असेल, तरच नाते आणखी दृढ होते. त्यामुळे सुनेने नेहमी सासूची आणि सासूनेही सुनेची मुलीप्रमाणे काळजी घ्यावी.

विशेष म्हणजे दोघींनी वेळप्रसंगी एकमेकींसाठी ठामपणे उभे राहावे. सासू व सून हे घरातील दोन भक्कम खांब आहेत. या दोन खांबांवर घराचा डोलारा उभा राहतो. त्यामुळे फक्त सासू-सुनेच्या नात्यापुरते नाही, तर एक स्त्री म्हणून दोघींनीही एकमेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter in law and mother in law relationship tips for better relation ndj
Show comments