खाण्याच्या चुकीच्या सवयी ही लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉलची कारणे तर आहेतच पण त्यांचा वाईट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. अकाली वृद्धत्व, पिगमेंटेशन, पुरळ, मुरूम अशा अनेक समस्या सतावू लागतात आणि याची काळजी न घेतल्यास त्यांचे डाग चेहर्यावर कायम तसेच राहतात. तर मग या समस्यांवर आपण आहार आणि त्वचेची निगा राखून कशी मात करू शकता, याविषयी जाणून घेऊया.
अकाली वृद्धत्व
चेहऱ्याच्या अकाली वृद्धत्वाचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी. जास्त साखर, मीठ आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. पुरेसे प्रमाणात पाणी पित रहा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा. त्यानंतर क्लिंझर आणि मॉइश्चरायझर चेहर्यावर वापरा. त्याचा खूप फायदा होतो. पेप्टाइड आधारित क्रीम्सचा त्वचेच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत समावेश करावा. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि रात्री योग्य वेळी झोपायला जा.
चेहर्यावर मुरुम
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा, पण उठल्यानंतरही चेहरा धुणे महत्त्वाचे आहे. फेसवॉशने चेहरा धुवा आणि बाहेर जात असाल तर किमान अर्धा तास आधी सन ब्लॉक क्रीम लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा जास्त वेळा चेहरा धुवू नका अन्यथा कोरडेपणा येऊ शकतो. तरीही पिंपल्स दूर होत नसतील तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
अभिनेत्री रवीना टंडन वयाच्या ४७ व्या वर्षीही तरुण दिसते, जाणून घ्या तिचा ‘हा’ फिटनेस मंत्र
मोठे छिद्र
मोठे छिद्र तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करण्याचे काम करतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. याकरिता या समस्या दूर करण्यासाठी ऑइल फ्री फेस वॉशने चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझर लावण्याची खात्री करा आणि तुमच्या नाईट केअर रूटीनमध्ये रेटिनॉल उत्पादने समाविष्ट करा. जे कोलेजन वाढवण्याचे आणि छिद्रांना घट्ट ठेवण्याचे काम करते. आहारात अ आणि क जीवनसत्त्वे असलेल्या गोष्टी खाणे फायदेशीर ठरेल.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)