टाटा मोटर्स मालकीच्या जग्‍वारची परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही ‘एफ-पेस एसव्‍हीआर’च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात केली आहे. जग्वार लँड रोव्हरने (Jaguar Land Rover India) भारतात आपल्या नवीन परफॉर्मन्स एसयूव्ही जग्वार एफ-पेस एसव्हीआरची डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली. ४०५kW च्या आउटपुटसह पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित ही शानदार SUV फक्त ४ सेकंदातच ० ते १०० किमी/ताशी स्पीड पकडू शकते. F-Pace SVR ची किंमत १.५१ कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जग्‍वारची ‘एफ-पेस एसव्‍हीआर’चे फीचर्स

जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरचे अचूकरित्‍या तयार करण्‍यात आलेले इंटीरिअर रिडिझाइन करण्‍यात आले आहे. इंटीरिअरमध्‍ये नवीन ड्राइव्‍ह सिलेक्‍टर, बीस्‍पोक एसव्‍हीआर स्प्लिट-रिम स्टिअरिंग व्‍हील, नवीन स्‍पोर्टी सेंटर कन्‍सोल, एकसंधीपणे एकीकृत करण्‍यात आले असून यात मध्‍यभागी माऊंट केलेले २८.९५ सेमी (११.४ इंच) कर्व्‍ह-ग्‍लास एचडी टचस्क्रिनसह नवीन पीवी प्रो इन्‍फोटेन्‍मेंट आणि केबिन एअर आयोनायझेशन आहे. जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरच्‍या नवीन तंत्रज्ञानांच्‍या कलेक्‍शनमध्‍ये सॉफ्टवेअर-ओव्‍हर-दि-एअर (एसओटीए) क्षमता आणि आधुनिक ३डी सराऊंड कॅमेरा तंत्रज्ञान देखील बसवण्यात आलेला आहे.

एफ-पेस एसव्‍हीआरच्‍या परफॉर्मन्‍सला थ्रॉटल रिस्‍पॉन्‍स, सस्‍पेंशन व स्टिरिंगसाठी जग्‍वार एसयूव्‍हीच्‍या इंजीनिअर्सनी विशिष्ट सॉफ्टवेअर सेटिंग्‍जसह सक्षम करण्यात आले आहे. तसेच प्रमाणित म्‍हणून बसवण्‍यात आलेल्‍या जग्‍वारच्‍या ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह इंटेलिजण्‍ट ड्राइव्‍हलाइन डायनॅमिक्‍सच्या माध्‍यमातून अधिक सुधारणा करण्‍यात आली आहे. त्याचबरोबर या नवीन जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरच्‍या उद्देशपूर्ण व रेस प्रेरित एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये नवीन एसव्‍हीआर-बॅज ग्रिल, सुधारित बम्‍पर डिझाइन, सुपर-स्लिम ऑल-एलईडी क्‍वॉड हेडलाइट्ससह ‘डबल जे’ डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल) सिग्‍नेचर्स आणि अॅडप्टिव्‍ह ड्रायव्हिंग बीम क्षमता खास करून देण्यात आलेली आहे.

जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरमध्‍ये ४०५ केडब्‍ल्‍यू व्‍ही८ सुपरचार्ज पेट्रोल इंजिन आहे, जे ७०० एनएमचा सर्वोच्‍च टॉर्क देते आणि ४.० सेकंदांमध्‍ये ०-१०० किमी/तास गती प्राप्‍त करते.

यावेळी “एफ-पेस एसव्हीआरचा भारतात प्रवेश हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे आणि आम्हाला खात्री आहे की ग्राहक त्याच्या चित्तथरारक आणि शक्तिशाली कामगिरीचा पुरेपूर आनंद घेतील,” असे यावेळी जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी म्हणाले.

तुम्हाला जर या नवीन जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जग्‍वार एफ-पेस एसव्‍हीआरच्या या अधिकृत वेबसाईटला http://www.jaguar.in भेट द्या.