गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे डेंग्यू व मलेरियाच्या डासांचा झपाटय़ाने प्रादुर्भाव वाढू लागला असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत ४९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या दिवसात ८३९ संशयित डेंग्यूच्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. गेल्या महिन्यात ७० डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र ऑगस्टच्या १५ दिवसांतच ४९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात हिवतापाचे ७५२ रुग्ण आढळले होते. तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात हिवतापाच्या रुग्णांची संख्या ५५८ वर पोहोचली आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू व हिवतापाचा प्रसार करणारे डास अंडी घालतात. यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत पालिकेने सुमारे ६२ लाखांहून अधिक घरांना भेटी दिल्या असून पाण्याची टाकी प्रतिबंधक नसणे, डास प्रतिबंध कारवाई करण्यास टाळाटाळ अशा अनेक कारणांनी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत ८,७४४ नोटिसा पाठविल्या आहेत.

विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला, ताप या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांत तापाच्या ४३३९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तापाच्या या रुग्णांना पालिका रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचारही देण्यात आले आहेत.