Dengue Fever: सध्या अनेक राज्यांमध्ये डेंग्यू तापाचा कहर वाढत आहे. पावसानंतर बदलत्या हवामानामुळे डेंग्यूचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, तीव्र तापासोबत स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यासोबतच डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. जर प्लेटलेटची संख्या जास्तच कमी झाली की, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत डेंग्यू तापाकडे थोडेसे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
डेंग्यू तापाची लक्षणे
डेंग्यूचा डास चावल्यानंतर त्याची लक्षणे तीन ते चार दिवसांत दिसू लागतात. संसर्ग झाल्यानंतर, त्याची लक्षणे रुग्णामध्ये तीन दिवस ते चौदा दिवस टिकतात. डेंग्यू तापासोबत थंडी वाजून ताप येणे, खूप ताप येणे, तसेच घसा, डोके आणि सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात. यामुळे रुग्णाला अशक्तपणा देखील जाणवतो आणि काहीही खावेसे वाटत नाही. डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी गुलाबी रंगाचे पुरळ देखील उठतात. या सगळ्याशिवाय शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते.
( हे ही वाचा: Swine Flu Symptoms: देशात पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत; वेळीच जाणून घ्या त्याची लक्षणे)
प्लेटलेट्स कमी जास्तच कमी झाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.डेंग्यू तापामध्ये रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागतात, जे जीवघेणे देखील ठरू शकतात. निरोगी शरीरात दीड ते दोन लाख प्लेटलेट्स असतात. जर ते एक लाखाच्या खाली आले तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे. जर प्लेटलेटची संख्या २० हजारांपेक्षा कमी असेल तर डॉक्टर प्लेटलेट्स देखील देतात.
डेंग्यू तापावर घरगुती उपाय
- भरपूर नारळ पाणी प्या.
- तुळशीची पाने पाण्यात उकळा आणि नंतर हे पाणी प्या.
- मेथीच्या पानांचा चहा बनवून प्या.
- शेळीचे दूध प्या. ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत, ज्यामुळे डेंग्यूचा ताप लवकर बरा होतो.
- पपईची पाने बारीक करून किंवा पाण्यात उकळून प्या. यामुळे शरीरातील वेदना, अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होईल.
- ३ ते ४ चमचे बीटरूटचा रस एक ग्लास गाजराच्या रसात मिसळून प्या. त्यामुळे रक्तपेशींची संख्या झपाट्याने वाढते.
( हे ही वाचा: Vitamin B7 Deficiency: ‘या’ एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुटतात नखे आणि गळतात केस; जाणून घ्या कसे)
डेंग्यूचा प्रतिबंध कसा करायचा
डेंग्यू ताप डासांच्या चाव्याव्दारे पसरतो, त्यामुळे तुम्ही डासांपासून जितके दूर राहाल तितके तुमच्यासाठी चांगले होईल. तसेच, आपल्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. आजूबाजूला पाणी साचले तर ते मातीने भरावे. असे करणे शक्य नसेल तर त्यात रॉकेलचे थेंब टाकावे. पावसाळ्यात उघडे पाणी पिऊ नका. पाणी नेहमी झाकून ठेवा. रात्री झोपताना रोज मच्छरदाणी वापरा.