पावसाळा म्हटलं की अनेक संसर्ग पसरतात. पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या आजारांचा धोका जास्त असतो. हे सर्व आजार असे आहेत की ते डास चावल्यामुळे होतात. हे आजार टाळण्यासाठी, अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जर तुम्ही स्वतःची नीट काळजी घेतली, तर तुम्ही या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही अतिशय सोप्या गोष्टी सांगणार आहोत. ज्याचे पालन केल्यास, तुम्ही पावसाळ्यामुळे होणारे आजार टाळू शकता. जाणून घ्या.
१) योग्य कपडे निवडा
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची संख्या झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, असे कपडे घाला जे तुमची त्वचा पूर्णपणे झाकून ठेवेल. यासाठी फुल स्लीव्ह पँट, लांब बाहींचा शर्ट घाला. चप्पल ऐवजी शूज घालण्याचा प्रयत्न करा. अशाने डास तुमच्या आजूबाजूला येणार नाहीत. तसंच डास न चावल्याने होणाऱ्या आजारांपासून देखील तुमचे संरक्षण होईल.
( हे ही वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)
२) डासांपासून बचाव अनिवार्य
या ऋतूत डासांपासून दूर राहणे खूप गरजेचे आहे.पावसाळ्यात घरात खूप डास येतात. अशावेळी या डासांपासून कसं वाचायचं याचा प्रश्न प्रत्येकाला असतो. त्यामुळे तुम्ही घरात असाल, किंवा बाहेर जात असाल तर मॉस्किटो रिपेलंट वापरा. याने तुमच्या जवळपास डास येणार नाहीत. तसंच घरात झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. मात्र, डास घालवताना कॉइल वापरणे सहसा टाळा.
३) बाहेर जाणे सहसा टाळा
संध्याकाळच्या वेळी डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे गरज असेल तेव्हच बाहेर जा. सहसा संध्याकाळच्या वेळी बाहेर जाणं टाळा. घरी असताना देखील, संध्याकाळनंतर घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. याने डास घरात येणार नाहीय. तसंच वेंटिलेशनसाठी, आपण गेट उघडून नेट स्थापित करू शकता.
( हे ही वाचा:पावसाळ्यात कपड्यांमधून दुर्गंधी येतेय? ‘या’ टिप्स फॉलो करा)
४) साचलेले पाणी स्वच्छ करा
पावसाळा म्हटलं तर पाणी हे साचतेचं. जेव्हा पाणी साचत त्या ठिकाणी डासांचा फैलाव जास्त होतो. अशावेळी घराच्या आजूबाजूला किंवा घरात पाऊस पडल्यानंतर पाणी साचले तर ते लगेच स्वच्छ करा. जास्त वेळ हे पाणी साचू देऊ नका. तुमजी यासाठी , पाणी ज्या ठिकाणी साचते त्या ठिकाणी रॉकेल टाकू शकता. अशाने डासांचा फैलाव होणार नाही.
५) घरात स्वच्छता ठेवा
पावसाळ्यात घरामध्ये स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरी कूलर असेल तर तो स्वच्छ करा आणि त्याची जाळीही बदला. आपण बदलू शकत नसल्यास, त्यांना पूर्णपणे स्वच्छ करा. याशिवाय कुंड्यांच्या आजूबाजूला साचलेले पाणी स्वच्छ करा आणि घरात फ्लॉवर पॉट असेल तर त्याचे पाणी दर इतर दिवशी बदला. घर स्वच्छ ठेवल्याने डासांची होणारी उत्पती देखील थांबेल आणि डास घरात येणार नाहीत.