डेंग्यूसाठी देण्यात येणाऱ्या अँटिबॉडी झिका विषाणूवर (व्हायरस) वर परिणामकारक ठरत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले आहे. झिका या गंभीर आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी लहान मुलांना या अँटिबॉडीची मदत होणार आहे.

एखादा विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शरीरात जो विशिष्ट प्रतिरक्षात्मक (प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याचा) प्रतिसाद मिळतो, त्यामध्ये रक्तद्रवात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना प्रतिपिंड असे म्हणतात. ब्राझील आणि इतर भागांमध्ये झिका विषाणूचा मोठा फटका बसला आहे. तसेच या भागामध्ये डेंग्यूचा प्रसार ही मोठय़ा प्रमाणात झाला आहे.

उंदीरांना अँटिबॉडीवर आधारित काही औषधे दिल्यामुळे त्यांच्या गर्भाशयाचे झिकापासून संरक्षण होते. त्याचा दुहेरी फायदा होत असून, झिका आणि डेंग्यू या दोन्ही आजारापासून संरक्षण होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

डेंग्यू आजारामध्ये लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल चट्टे येणे, मळमळणे आणि उलटय़ा येणे यासह इतर काही लक्षणे दिसून येतात. मात्र यामध्ये थेट गर्भाला हानी पोहोचत नाही, असे संशोधकांनी सांगितले.

देण्यात येणाऱ्या अँटिबॉडीमुळे डेंग्यूचे विषाणूच कमी होत नाहीत तर गर्भाशयाचे झिका आजारापासून संरक्षण होते. डेंग्यू आणि झिका विषाणू एकमेकासंबंधित आहेत. डेंग्यू विषाणूला रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या अँटिबॉडी झिका विषाणूवर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले असल्याचे संशोधकांनी सांगितले.