Shaving Tips For Men : काही पुरुषांना दाढी करायला आवडत नाही, तर काहींना दाढी करायला आवडते. असे लोक थोडी दाढी जरी वाढली की लगेच शेव्हिंग करतात. यातही काही जण घरीच दाढी करतात. पण अनेकदा दाढी केल्यानंतर मानेवर आणि चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कापलेल्या खुणा दिसू लागतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवते. हे दाढी योग्यरित्या न केल्याने होते असे म्हटले जाते. कारण चुकीच्या पद्धतीने दाढी केल्यानंतर अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेज, बॅक्टेरिअल इन्फेक्शनसारख्या त्वचेच्या समस्या जाणवतात. अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

याच विषयावर त्वचारोगतज्ज्ञ आणि त्वचा शल्यचिकित्सक डॉ. अग्नि कुमार बोस यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेज, बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणार नाही, शिवाय चेहरा मुलायम आणि सुंदर दिसेल, याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.

दाढी करण्याची योग्य पद्धत

डॉ अग्नी सांगतात की, दाढी करण्याचा एकच नियम आहे जो लक्षात ठेवणे आवश्यक आहे, तो म्हणजे केसांच्या ग्रोथकडे लक्ष देणे. गालाजवळील केस वाकड्या दिशेने खालच्या दिशेने वाढत असतील आणि मानेवरील केस वरच्या दिशेने वाढले असतील, तर शेव्हिंग करताना गालाजवळील केस रेझरने वरुन- खाली अशापद्धतीने काढा, तर मानेवरील केस रेझरने खालून -वर अशापद्धतीने काढा. जर तुम्ही शेव्हिंग करताना रेझर गालावर वरपासून खालपर्यंत एकाच डायरेक्शनने फिरव दाढी करत असाल तर अशाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. याने इनग्रोन हेअरची ग्रोथ होऊ लागते.

डॉ. अग्नी यानी पुढे सांगितले की, मुली वॅक्सिंगच्या वेळी हात किंवा पायांना वॅक्स लावून केस उलट्या दिशेने खेचतात. ज्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे पुरळ उडतात, जे फार वेदनादायक असतात. अनेकदा वॅक्समुळे त्वचेला खाज सुटते आणि चिडचिड होते.

डॉ. अग्नी सांगतात की, महिला देखील चेहऱ्यावर शेव्हिंग करु शकता. दाढी केल्यावर चेहऱ्यावर दाट केस येऊ लागतात, त्यामुळे महिलांनी चेहऱ्यावर रेझर फिरवू नये असे अनेकदा सांगितले जाते, मात्र डॉ. अग्नी हे खोटं असल्याचे म्हणतात.

दाढी करताना ‘या’ ५ गोष्टी ठेवा लक्षात

१) दाढी करताना इतर काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जसे की, दाढी काढण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे चेहरा नीट स्वच्छ करणे आणि एक्सफोलिएट करून शेव्हिंग करणे. ज्यामुळे दाढी योग्यपद्धतीने करता येते.

२) दाढी करण्यासाठी चांगल्या दर्जाचा रेझर वापरणे फार महत्वाचे आहे. निकृष्ट दर्जाचा रेझरमुळे दाढी नीट होत नाही आणि काहीवेळा त्वचा कापण्याची किंवा त्यामुळे इतर समस्यांची भीती वाढते.

३) ड्राय शेव्हिंग करणे टाळा. शेव्हिंग करताना साबण किंवा शेव्हिंग क्रीमचा वापर करा, कारण यामुळे दाढी करणे सोपे होते. तसेच त्वचा कापण्याची शक्यताही कमी होते.

४) रेझरने जास्त जोर लावून दाढी करु नका. हलक्या हातांनी दाढी करणे चांगले.

५) दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. तसेच त्वचा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.