White or Yellow Corn Which Is Better: हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस आणि मक्याचे कणीस हे पूर्वापार चालत आलेले समीकरण आहे. काळ्या ढगांनी आभाळ भरलेले असताना, पावसाच्या रिमझिम सरींनी गारवा पसरलेला असताना, भाजलेले कणीस त्यावर लिंबाच्या रसाचा व मीठ-मसाल्याचा ट्विस्ट आणि छान जुनी गाणी या कॉम्बोला कसलीच तोड नाही. कॉर्न फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर मानला जातो. तुम्हालाही आता गल्लोगल्ली मक्याच्या कणसाचे विक्रेते दिसून येतील पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, अलीकडच्या काळात मूळ भारतीय पद्धतीचा मका हा बाजारातून दिसेनासा होत चालला आहे. आज आपण योग्य व सर्वाधिक पोषण देणारा मका कोणता याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्या इंस्टाग्राम पेजवर, पोषणतज्ज्ञ गझल फर्निचरवाला यांनी पांढऱ्या व पिवळ्या अशा भारतीय व अमेरिकन दोन्ही पद्धतीच्या मक्याची वैशिष्ट्य शेअर केली आहेत. गझलने सांगितले की, “बाजारात विविध रंगांमध्ये देसी कॉर्नचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, जसे केशरी, जांभळा आणि इंद्रधनुष्याचे इतर रंग. पण अलीकडे पांढरे कणीस फार कमी पाहायला मिळते. आपल्याकडेही सर्वत्र पिवळे कॉर्न्स पाहायला मिळतात. पांढरे कणीस हे देशी कॉर्न म्हणून ओळखले जातात.

Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
how to take care of soil
उत्तम अन्न हवे, तर मातीचे आरोग्य सांभाळावेच लागेल!
CIDCOs Naina projrct farmers question what will happen to their houses and government will take suggestions
राहत्या घरांचे भवितव्य काय? उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
Rising vegetable prices becoming major issue for women running home based restaurants
घरगुती खानावळ, पोळी भाजी केंद्र दुहेरी आर्थिक कोंडीत, भाज्यांचे वाढत्या दरामुळे खर्चात वाढ
benefits of custard apple cultivation
लोकशिवार : फायदेशीर सीताफळ
traders soybean goods are kept in sheds and farmers goods are kept in open place in market committee in yavatmal
यवतमाळ : अजब न्याय! शेतकऱ्यांचा माल बाहेर अन् व्यापाऱ्यांचा मात्र…

पांढऱ्या मक्याचे फायदे (Desi Corn Benefits)

आहारतज्ज्ञ मुनमुन गनेरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, देशी कॉर्नच्या शेतीसाठी अगदी कमीत कमी पाणी व खतांची आवश्यकता असते. पांढऱ्या कणिसांमधील साखरेचे जटिल स्टार्चमध्ये रूपांतर होते जे मानवी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाहीत व यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील ग्लुकोजही नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते. हे पांढरे कॉर्न सामान्यतः भाजून खाल्ले जातात किंवा भाजी, खिचडी, यात वापरले जातात.

हे ही वाचा<< Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा

पिवळ्या मक्याचे वैशिष्ट्य (Yellow Corn)

गनेरीवाल यांनी सांगितले की, स्वीट कॉर्न, म्हणजेच अमेरिकन प्रजातीचे पिवळे कॉर्न. हे कॉर्न संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असू शकतात. हे पिवळे स्वीट कॉर्न संकरित बियाण्यांपासून पिकवले जातात व यासाठी भरपूर संसाधने लागतात. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींसाठी हा अगदी हेल्दी पर्याय ठरेलच असे नाही. त्यामुळेच तुलनेने पांढरे (देशी) कॉर्न हे पिवळ्या (स्वीट कॉर्न) पेक्षा अधिक पौष्टिक तसेच निसर्गास फायदेशीर ठरू शकतात.

Story img Loader