Desi Jugaad : जर घरातील बेडशीट जुनी झाली असेल किंवा फाटलेली असेल, तर आपण लगेच नवी बेडशीट खरेदी करतो आणि जुनी बेडशीट फेकतो; पण असे चुकूनही करू नका. काही घरगुती जुगाडच्या मदतीने तुम्ही जुन्या किंवा फाटलेल्या बेडशीटचा वापर पुन्हा नव्याने करू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत …

फाटलेली बेडशीट तुम्ही फरशी पुसण्यासाठीसुद्धा वापरू शकता. याशिवाय बेडशीटचे तुकडे करून तु्म्ही फर्निचर, खिडकी दरवाजेसुद्धा पुसू शकता. स्वच्छतेसाठी ही बेडशीट फायदेशीर ठरेल.

Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Loksatta chaturang article about Kitchen transformation
स्वयंपाकघर ते किचन गोष्ट एका प्रवासाची
Olya Narlacha Paratha Recipe in marathi
रविवारी स्पेशल नाश्त्यासाठी झटपट बनवा चवदार ओल्या नारळाचे पराठे; वाचा सोपी रेसिपी
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत

हेही वाचा : Eating Food : दर दोन तासांनी खाणे चांगले आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

कापडांचा सर्वांत जास्त उपयोग स्वयंपाकघरात असतो. अशा वेळी फाटलेल्या बेडशीटच्या कापडांचे तुकडे तुम्ही स्वयंपाकघरात विविध कामांसाठी वापरू शकता. स्वयंपाकघरासाठी तुम्हाला नवीन कापड खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

जर बेडशीट जुनी असेल, तर तुम्ही त्याचा ॲप्रन बनवू शकता. ॲप्रन बनविणे खूप सोपी गोष्ट आहे. जर तुम्हाला ॲप्रन बनवता येत नसेल, तर तुम्ही यूट्युबवरील व्हिडीओ पाहूनही घरच्या घरी तो बनवू शकता.

फाटलेल्या बेडशीटपासून तुम्ही उशी कव्हर बनवू शकता. याशिवाय लहान मुलांसाठी लहान आकाराची चादर किंवा बेडशीट बनवू शकता.

हेही वाचा : Tomatoes : टोमॅटोमध्ये कोणते पौष्टिक घटक असतात? गर्भवती आणि मधुमेहाच्या रुग्णांनी टोमॅटो खावेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे खूप चुकीचे आहे. अशात जुन्या बेडशीटपासून बनवलेली कापडी पिशवी फायदेशीर ठरते. ही कापडी पिशवी फळे, भाज्या आणण्यासाठी चांगला पर्याय आहे.

फाटलेल्या किंवा जुन्या बेडशीटपासून तुम्ही टेबल रुमालही बनवू शकता. त्यामुळे तुमच्या घरातील टेबल आणखी सुंदर दिसेल. त्याशिवाय तुम्ही या बेडशीटपासून खिडक्यांसाठी चांगले पडदेही बनवू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)