Devendra Fadnavis Weight Loss Journey: राजकारणात एकमेकांची उणी-दुणी काढायची अनेक नेते व त्यांच्या समर्थकांना सवय असते, किंबहुना ती त्या त्या वेळेची गरजही असावी. मागील काही वर्षात तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन अनेकांनी एकमेकांच्या वजन, रंगवरूनही कमेंट्स केलेल्या आहेत. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा वजनावरून अनेकदा टार्गेट केलं जात होतं. पण या सर्व टीकाकारांना फडणवीस यांनी चक्क तीन महिन्यात १८ किलो वजन कमी करून सडेतोड उत्तर दिलं होतं. काही वर

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, “देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांत जवळपास १८ किलो वजन कमी केले. फडणवीस यांचे वजन जवळपास १२२ किलो होते, परंतु शिस्तबद्ध दिनचर्या व डाएटच्या मदतीने त्यांनी आपले वजन चक्क तीन महिन्यात १०४ किलोपर्यंत खाली आणले होते. शिवाय अजूनही ते आपले टार्गेट वजन म्हणजेच ८८-९० किलो दरम्यान स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीचा मोठा भाग हा चयापचय (मेटाबॉलिज्म) वाढवण्यावर भर देणे हा होता. यासाठी त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि साप्ताहिक दोन तासांचा व्यायाम व औषधे असे तिन्ही पैलू आपल्या रुटीनमध्ये जोडले होते.”

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय

फडणवीस यांच्या वजन घटवण्याचा प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जन जयश्री तोडकर, यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “दोन महिन्यांच्या निरीक्षणानंतर आम्हाला असे लक्षात आले होते की फडणवीस यांचे मेटाबॉलिजम अत्यंत लवचिक आहे आणि त्यामुळे वैद्यकीय उपचारांनी त्यांचे वजन कमी करता येऊ शकते. तसंच त्यांचे डाएट योग्य नसल्यामुळेही त्यांचे वजन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

देवेंद्र फडणवीस यांचा डाएट प्लॅन

तोडकर यांनी फडणवीस यांच्या डाएटविषयी सांगितले की, त्यांना तसंही फार गोड खायला आवडत नसल्याने त्यांना दिवसातून एका चहाची परवानगी देण्यात आली होती. शरीरात प्रोटीनची शाकाहारी (पनीर, मसूर) आणि मांसाहारी (चिकन, मासे) यांचे मिश्रण समाविष्ट कार्नाय्त आपले होते. कार्बोहायड्रेट गरजा पूर्ण करण्यासाठी भाकरी, चपाती किंवा संपूर्ण गव्हाच्या ब्रेडचा पर्याय देण्यात आला होता. फायबरसाठी हिरव्या भाज्या आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे डाळिंब, सफरचंद, जांभूळ अशी फळे आहारात समाविष्ट करण्यात आली होती. लोणी किंवा तुपावर कोणता निर्बंध लावलेला नव्हता मात्र एक चमच्याहुन अधिक सेवनाची मुभा नव्हती.

देवेंद्र फडणवीस यांचे व्यायामाचे रुटीन

याशिवाय फडणवीस यांच्या कामाचे अनियमित वेळापत्रक व त्यात भरपूर प्रवासाचा समावेश असल्याने त्यांना वेगळे वर्कआउट रुटीन देण्याची गरज नव्हती. उलट ते नियमित आवश्यक (किमान) १०,००० पायऱ्यांपेक्षा जास्त व वेगाने चालत होते. त्यांच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीचे स्तर मोजण्यासाठी आम्ही पेडोमीटर वापरला होता. “

तर दुसरीकडे, सर्वांगीण आरोग्य गुरू मिकी मेहता यांनी सुद्धा या वजन कमी करण्याच्या व हेल्दी आयुष्य जगण्याच्या मोहिमेत फडणवीस यांना मार्गदर्शन केले होते. मेहता यांनी फडणवीस यांच्या व्यायामाविषयी सांगताना म्हटले की,”त्यांना फक्त चार ते पाच तासांची झोप मिळते. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे झोपेची कमतरता दूर करण्यात मदत झाली होती”.

हे ही वाचा<< नितीन गडकरींनी १३५ वरून ८९ किलोपर्यंत वजन कमी करताना ‘हे’ ७ व्यायाम नेटाने केले; श्वसन समस्याही केल्या दूर

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ही फिटनेस जर्नी साधारण २०१६ पासूनच सुरु केली होती. यानंतर आता तब्बल ८ वर्षांनी फडणवीस यांच्या फिटनेसमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचे आपणही पाहू शकता.

Story img Loader