मधुमेहींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ग्लुकोजची चाचणी रक्ताऐवजी लाळेच्या वापरातूनही करता येणे शक्य आहे, ही पद्धत विश्वासार्ह असून त्यामुळे सुई टोचून रक्त काढण्याची समस्या दूर होणार आहे.
 ब्राऊन येथील वैज्ञानिकांनी एक जैविक चीप (पट्टिका) विकसित केली असून त्यात लाळेसारख्या गुंतागुंतीच्या द्रवातून ग्लुकोज तपासता येते. ही एक प्रगत पद्धत विकसित करण्यात आली असून रक्त न काढताही शरीरातील शर्करेचे मापन करता येणार आहे. ही छोटीशी चिप अवघ्या एक इंच चौरस आकाराची असून त्यात क्वार्टझला चांदीचा थर दिला असतो.
चांदीच्या पत्र्यात दोन मार्गिका कोरलेल्या असतात. त्यातील २०० नॅनोमीटर बाय १०० नॅनोमीटर आकाराच्या मार्गिका आहेत त्या मानवी केसाच्या १००० पट बारीक आहेत. ब्राऊन येथील डॉमनिको पॅसिफिकी यांनी सांगितले की, आम्ही लाळ तपासून अतिशय विश्वासार्ह पद्धतीने शर्करेचे प्रमाण सांगू शकतो. खरेतर रक्तापेक्षा लाळेत कमी शर्करा असते पण तरीही संवेदनशील मार्गाने शर्करा मोजता येते. लाळेत ९९ टक्के पाणी व १ टक्का मात्र वेगळा पदार्थ असतो त्यात विकर, क्षार व इतर घटक असतात त्यांच्या मदतीने रक्तातील साखर मोजता येते. ज्याचा माग काढता येईल असा ग्लुकोज दर्शक वैज्ञानिकांनी तयार केला व तो चिपवरील मार्गिकांमधून सोडला नंतर त्याची अभिक्रिया रक्तातील ग्लुकोजची दोन विकरांशी अभिक्रिया होते.
पहिले विकर हे ग्लुकोज ऑक्सिडेज असून त्याची ग्लुकोजशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन पेरॉक्साईडचे रेणू तयार होतात व त्यातून हॉर्सरॅडीश पेरॉक्सिडेज तयार होते त्यातून रिसोरुफिन बनते ते लाल प्रकाश शोषून घेऊ शकते किंवा बाहेर सोडते त्यामुळे द्रावणाला रंग प्राप्त होतो. त्यानंतर लाल रंगाच्या द्रावणातील रिसोरुफिन रेणू तपासता येतात. या पथकाने रंग रसायनशास्त्र व प्लासमोनिक इंटरफेरोमेट्री यांच्या मदतीने कृत्रिम लाळेतील ग्लुकोजचे प्रमाण तपासले, ही कृत्रिम लाळ म्हणजे, पाणी, क्षार व विकर यांचे मिश्रण होते ते खऱ्या लाळेसारखेच होते. त्यांना त्यातील ग्लुकोजचे प्रमाण लिटरला ०.१ मायक्रोमोल इतके आढळले. ते इंटरफेरोमीटरने मापन केलेल्या प्रमाणापेक्षा १० पट अचूक होते. आता मानवी लाळेवर याचे प्रयोग केले जाणार असून ही पद्धत ग्लुकोज तपासण्यासाठी सोपी व सुटसुटीत ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा