मधुमेहाच्या समस्येमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर वारंवार तहान लागणे, लघवीला जाणे अशी लक्षणे दिसतात. याशिवाय याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. एका संशोधनानुसार, मधुमेहामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. यामुळे रुग्णांना निद्रानाश, वारंवार जाग येणे, झोपण्यास त्रास होणे किंवा खूप झोपेचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुमची झोप नीट होत नसेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते. मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीचा त्रास होतो. याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे मधुमेही रुग्णांना थरथरणे, चक्कर येणे, घाम येणे अशा समस्याही जाणवतात.
झोपेच्या कमतरतेचे परिणाम
झोपेचा अभाव रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतो. यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स बदलू शकतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर भरपूर झोप घ्या. झोप कमी झाल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्याच वेळी, यामुळे लठ्ठपणाची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.
(हे ही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन फायदेशीर आहे का? जाणून घ्या)
झोपेशी संबंधित समस्या
१. स्लीप एपनिया ही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सर्वात सामान्य समस्या आहे. जेव्हा तुमचा श्वास वारंवार थांबतो तेव्हा स्लीप एपनिया होतो. मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना हा त्रास होऊ शकतो.
(हे ही वाचा: तुमच्या ‘या’ पाच चुका रक्तातील साखर वाढवू शकतात, जाणून घ्या कसे ठेवावे नियंत्रण)
२. रेस्टलेस लेग सिंड्रोम (RLS) ही एक समस्या आहे ज्यामध्ये सतत पाय हलवण्याची इच्छा होते. संध्याकाळच्या वेळी ते सर्वाधिक असते, ज्यामुळे झोपणे कठीण होऊ शकते. मधुमेहाशिवाय लोहाच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
(हे ही वाचा: मधुमेह असलेल्यांनी गोड खाऊ नये? सत्य काय आहे ते जाणून घ्या)
३. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे निद्रानाशाची समस्या होऊ शकते. जे लोक लघवी करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी वारंवार उठतात त्यांना हा त्रास जास्त होतो. जर तुम्हाला उच्च ग्लुकोज पातळी किंवा तणावाचा त्रास होत असेल तर यामुळे निद्रानाश होऊ शकतो.